अमली पदार्थ पाजून कलाकारावर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 12:18 IST2024-03-05T12:17:29+5:302024-03-05T12:18:11+5:30

दुमका जिल्ह्यात एका परदेशी पर्यटकावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या काही दिवसानंतर ही घटना घडली आहे.

Artist gang-raped after consuming drugs | अमली पदार्थ पाजून कलाकारावर सामूहिक बलात्कार

अमली पदार्थ पाजून कलाकारावर सामूहिक बलात्कार

मेदिनीनगर : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात छत्तीसगडमधील एका २१ वर्षीय रंगमंच कलाकारावर तिच्या सहकलाकारांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुमका जिल्ह्यात एका परदेशी पर्यटकावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या काही दिवसानंतर ही घटना घडली आहे.

पलामू येथील तीन सहकलाकारांनी रंगमंच कलाकाराला अमली पदार्थ पाजले आणि कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी तिला बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला,  असे विश्रामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) राकेश सिंह यांनी सांगितले. या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Artist gang-raped after consuming drugs