शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

तरूणींना अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देणारा जेरबंद; आरोपीवर राज्यभर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 7:09 PM

मुलींनी सावधानता बाळगून आपले चारीत्र्याची बदनामी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे

ठळक मुद्देबनावट फेसबुक अकाऊंटद्वारे तरूणींचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

बारामती: बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे तरूणींचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या नराधमास बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अखेर जेरबंद केले. हा आरोपी फेसबुव्दारे तरूणींचे मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्यासोबत बोलण्यासाठी दबाव टाकत असे. एखादी तरूणी न बोललल्यास सबंधित तरूणीला तिचे बनावट अश्लिल फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी हा आरोपी देत होता. राज्यभर या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल झाले होते, अशी माहिती गुन्हे शोध पथकाच्या वतीने देण्यात आली.संदीप सुखदेव हजारे (वय २९, रा. आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दहिवडी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर समर्थ पोलीस ठाणे पुणे, घारगाव पोलीस ठाणे अहमदनगर, कराड पोलीस ठाणे, संगमनेर पोलीस ठाणे, या पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मुलींना अश्लिल फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बारामती तालुक्यातील एका गावातील एका तरुणीला तिचे बनावट अश्लिल फोटो पाठवून तेच फोटो वायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानुसार तरुणीने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने रविवारी (दि. ५) रोजी रात्री गुन्हे शोध पथकाने छडा लावत आरोपीला दहिवडी ( ता. खटाव, जि.सातारा ) येथून ताब्यात घेतले आहे, बारामती तालुका गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी त्यांच्या पथकाला घेऊन आरोपीच्या घरी जाऊन त्याला अटक केली. आरोपीने शंभरहून अधिक मुलींना फेसबुकवरून त्यांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन,  त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असू शकतात, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

फेसबुकवर मुलींचे नंबर घेऊन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, नंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी करत मानसिक त्रास देऊन, अश्लील बनावट फोटो बनवून धमक्या दिल्या जातात. याबाबत मुली बदनामी खातीर तक्रार देण्यासाठी घाबरत असतात. यामुळे समाज विकृत आणखी मुलींना छेडण्याचा प्रयत्न करतात यामुळे आशा इसमांवर सायबर गुन्हेगारी अंतर्गत कारवाई होण्यासाठी मुलींनी बळी न पडता पोलीसांकडे तक्रार देणे गरजेचे आहे.

बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमुख योगेश लंगुटे, पोलीस नाईक परिमल माणेर, नंदू जाधव, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे यांनी ही कामगिरी बजावली आहे.

..............................

सध्या सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण वाढून मुलींसहीत तरुणांच्या देखील फसवणुकी, बदनामीला बळी पडत आहेत. फेसबुक वापरणाऱ्या तरुणी, महिला यांनी अनोळखी व्यक्तीपासून सावधानता बाळगून आपली बदनामी होणार याची काळजी घ्यावी, तसेच कुणाच्या बाबतीत वरील प्रमाणे तक्रारी असल्यास न डगमगता पोलिसांशी संपर्क साधावा, तक्रार देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवण्यात येईल.- अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक, बारामती ग्रामीण पोलीस ठाणे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFacebookफेसबुक