शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचे मोबाईल चोरणारा अटकेत; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 21:18 IST

याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.

ठळक मुद्देमोहम्मद शेख (२२, रा. कळवा) या सराईत चोरटयाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलीचोरटयांनी सुमारे १७ लाख २९ हजाराचे मोबाईल चोरल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती.

डोंबिवली - एका मोबाईल दुकानातून लाखोंचे मोबाईल चोरणाऱ्या मोहम्मद शेख (२२, रा. कळवा) या सराईत चोरटयाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.

डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन रोड परिसरातील एका मोबाईलचे दुकानाचे शटर तोडून चोरटयांनी सुमारे १७ लाख २९ हजाराचे मोबाईल चोरल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली होती. या गुन्हयाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग करत होते. मोहम्मद हा कळवा येथील शांतीनगर परिसरात येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजु जॉन यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. याच माहितीच्या आधारे पथकाने गुरुवारी परिसरात सापळा रचत संशयीत आरोपी मोहम्मदला ताब्यात घेतले.

अशा प्रकारे गुन्हे शाखा घटक -३ कल्याणमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घरफोडी चोरीच्या गुन्हयातील अज्ञात आरोपीसंबंधी कोणताही धागादोरे उपलब्ध नसताना, अज्ञात आरोपीत यांचा तांत्रिक विश्लेषण आणि कळवा परिसरात अल्प कालावधीतच गुप्त बातमीदार तयार करून त्यांचे मार्फतीने अचूक माहिती काढून गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून, आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेऊन अतिशय अल्पकालावधीतच कौशल्यपुर्वक तपास करून इतर चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या आरोपीस पुढील तपासकामी विष्णुनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, सपोनि भुषण दायमा, पोउनि नितीन मुदगुन, पोउनि शरद पंजे, पोउनि दिधे, पो.हवा. भोसले, पो.हवा.घोलप, पो.हवा. मालशेट्टे, पो.हवा. पवार, पो.ना. शिर्के, पो.ना. निकुळे, पो.ना. खिलारे, पोना साळवी, पोना पाटील, पोना बंगारा, मपोना इरपाचे, पोशि राजपुत, पोशि ईशी, मपोशि रहाणे यांनी केलेली आहे.

टॅग्स :ArrestअटकMobileमोबाइलkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसRobberyचोरी