Arrested rickshaw driver who were looking at the young girl and masturbating | तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी ठोकल्या
तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी ठोकल्या

ठळक मुद्देहे पथक रिक्षाचालकाचा रिक्षा पार्किंग स्टॅण्ड, बसथांबे आदी ठिकाणी शोध घेत होते. आरोपी रिक्षाचालकाने गुन्हा कबूल केला असून तो भाड्याने रिक्षा शिफ्टवर घेऊन चालवतो.

मुंबई - सार्वजनिक ठिकाणी महिलांशी असभय वर्तन करून अश्लील चाळे करणाऱ्या विकृत रिक्षाचालकास गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने अटक केली आहे. १ सप्टेंबरला एक तरुणी नेहमीप्रमाणे ऑफिसहून घराकडे जात असताना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मालाड पश्चिमेकडील चिंचोली बंदर बस स्टॉपजवळ वाहनांची वाट पाहत होती. त्यावेळी त्याठिकाणी एक अज्ञात रिक्षाचालक आला आणि त्या तरुणीस रिक्षात बसण्यास सांगू लागला. तरुणी रिक्षाचालकाकडे पाहत असताना त्याने अश्लील हावभाव करून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या रिक्षाचालकांच्या कृत्याने तरुणी घाबरून गेली गेली आणि तिने तिचा मोबाईल काढून रिक्षाचालकांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर रिक्षाचालकाने घटनस्थळाहून पळ काढला होता. याबाबत तरुणीने बांगूर नगर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या विकृत रक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या वरिष्ठांनी वेळोवेळी गुन्हे शाखा कक्षांना दिल्या आहेत. या अनुषंगाने कक्ष - ११ ने अज्ञात रिक्षाचालकाला शोधण्यास पोलिसांचे पथक तयार केले. हे पथक रिक्षाचालकाचा रिक्षा पार्किंग स्टॅण्ड, बसथांबे आदी ठिकाणी शोध घेत होते. तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे फुटेजची तपासणी करण्यात आली. फिर्यादी तरुणीने आरोपी रिक्षाचालकाने केलेल्या वर्णनानुसार मालाड, गोरेगाव, मालवणी, गणपत पाटील नगर, दहिसर चेकनाका परिसरात रिक्षाचालकाचा आणि रिक्षेचा पोलीस शोध घेत होते. ११ सप्टेंबरला बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून कक्ष - ११ ने मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरातून ३२ वर्षीय आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. आरोपी रिक्षाचालकाने गुन्हा कबूल केला असून तो भाड्याने रिक्षा शिफ्टवर घेऊन चालवतो. या आरोपीविरोधात मुंबईत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत मारामारी, विनयभंगाचे गुन्हे नोंद असल्याचे आढळून आले आहे. 


Web Title: Arrested rickshaw driver who were looking at the young girl and masturbating
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.