shaadi.com वर महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 15:11 IST2019-12-06T15:10:10+5:302019-12-06T15:11:20+5:30
मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पंचवटी नाशिक येथील एका हॉटेलमध्ये बेड्या ठोकल्या.

shaadi.com वर महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास अटक
नाशिक - ठाणे जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात दाखल बलात्कार व फसवणूक च्या गुन्ह्यात फरार संशयित आरोपी संपत चांगदेव दरवडेउर्फ मनोज पाटील ३४, रा. क्रिस्टल पार्क, हडपसर, पुणे, मूळ नेवासा फाटा, अहमदनगर) यास एका महिलेची फसवणूक करताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पंचवटी नाशिक येथील एका हॉटेलमध्ये बेड्या ठोकल्या.
हा संशयित मनोज shaadi.com या संकेतस्थळावर स्वतःचे छायाचित्रे अपलोड करून, विधवा, घटस्फोटीत महिलांना लग्नाचे आमिष दाखवून स्वतःच्या आर्थिक, शारीरिक फायदा करून घेत फसवणूक करत होता. त्याने मुंबई, ठाणे, अहमदनगर, पुणे अशा शहरांमध्ये गुन्हे केले असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. नाशिक पंचवटी येथे सुद्धा तो अशाचप्रकारे एक महिलेला फसविण्याच्या इराद्याने आला होता. याबाबत महिलेच्या भावाने पोलिसांना माहिती दिली असता मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या पथकाने सापळा रचून मनोजला बेड्या ठोकल्या