प्रेमाचा असाही अंत! होणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येनंतर सैनिकानेही संपवलं जीवन, भावूक करणारं स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 15:02 IST2021-09-07T14:59:05+5:302021-09-07T15:02:13+5:30

पप्पू यादव देहरादूनमध्ये तैनात होता. तीन वर्षाआधी त्याचा चित्तोडगढ येथील एका तरूणीसोबत साखरपुडा झाला होता.

Army jawan ends life 3 days after suicide his fiance in kota Rajasthan | प्रेमाचा असाही अंत! होणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येनंतर सैनिकानेही संपवलं जीवन, भावूक करणारं स्टेटस

प्रेमाचा असाही अंत! होणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येनंतर सैनिकानेही संपवलं जीवन, भावूक करणारं स्टेटस

राजस्थानच्या कोटामध्ये सेनेतील एका जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेनेतील या जवानाचं नाव पप्पू यादव सांगितलं जात आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीने आत्महत्या केल्यावर तीन दिवसातच त्यानेही एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुट्टीवर आला होता जवान

पोलिसांनी सांगितलं की, सेनेतील कुमाउं रेजीमेंटचा जवान पप्पू यादव सुट्टी घेऊन घरी आला होता आणि जेव्हापासून त्याच्या होणाऱ्या बायकोने आत्महत्या केली होती तेव्हापासून तो तणावात होता. पप्पू यादव देहरादूनमध्ये तैनात होता. तीन वर्षाआधी त्याचा चित्तोडगढ येथील एका तरूणीसोबत साखरपुडा झाला होता. पोलिसांनुसार, सोमवारी सकाळी तो देवलीकला गावातील त्याच्या घराच्या शेजारी असलेल्या शेतात गेला आणि झाडाला गळफास घेतला. (हे पण वाचा : जुळ्या भावांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा, जे समोर आलं ते पाहून पोलिसही हैराण)

पोलीस अधिकारी राजेंद्र मीणा म्हणाले की, जवानाच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. त्याचा मृतदेह पोस्टमार्टम करून त्याच्या परिवाराकडे सोपवण्यात आलाय. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

भावूक करणारा अखेरचा मेसेज

सेनेतील जवान प्रेमात असफल झाला तर त्याने त्याचं जीवन संपवलं. तो त्याच्या होणाऱ्या बायकोच्या मृत्यूची बातमी ऐकल्यापासून तणावात होता. आत्महत्या करण्याआधी त्याने सोशल मीडियावर एक स्टेटस टाकलं होतं. जे फारच भावूक करणारं आहे. हे स्टेटस वाचून लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. आत्महत्या करण्याआधी जवानाने त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर लिहिलं होतं की, 'जया तुम नहीं तो मैं भी नहीं'. 

जेव्हा जवानाच्या मित्रांनी त्याचा हा स्टेटस मेसेज पाहिला तेव्हा त्यांनी त्याला फोन करून याचं कारण विचारलं. पण त्याने काही उत्तर दिलं नाही. त्यानंतर काही तासांनी त्याने या जगाला अखेरचा सलाम केला.
 

Web Title: Army jawan ends life 3 days after suicide his fiance in kota Rajasthan