जुळ्या भावांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा, जे समोर आलं ते पाहून पोलिसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 12:53 PM2021-09-07T12:53:13+5:302021-09-07T12:55:00+5:30

मृतक मुलांची काकू अणछी बाईचं मुलांच्या आईसोबत म्हणजे चांदनी बाईसोबत पटत नव्हतं. कौटुंबिक कलहामुळे त्यांची सतत भांडणं होत होती.

Rajasthan : Rajsamand twin brothers murder revealed aunt had taken lives of innocent | जुळ्या भावांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा, जे समोर आलं ते पाहून पोलिसही हैराण

जुळ्या भावांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा, जे समोर आलं ते पाहून पोलिसही हैराण

Next

(प्रातिनिधिक छायाचित्र)

राजस्थानच्या राजसमंद जिल्हा पोलिसांनी खेडा गावात झालेल्या ७ वर्षीय जुळ्या भावांच्या हत्येचा खुलासा केला आहे. गेल्या २ तारखेला जुळ्या भावांची हत्या झाली होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आता पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मुलांच्या हत्येप्रकरणी त्यांची काकू अणछी बाईला अटक केली आहे. 

जिल्हा पोलीस अधिक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितलं की, खमनोर पोलीस स्टेशनमध्ये दोन तारखेला मुलांची आई चंदनी बाईने आपल्या जुळ्या मुलांची म्हणजे तंवर सिंह आणि भूपेंद्र सिंग यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. ३ सप्टेंबरला उदयपूरहून एक डॉग स्क्वायड टीम बोलवण्यात आली.

विहिरीत सापडले मृतदेह

यादरम्यान शोधाशोध सुरू असताना एका शेतातील विहिरीत दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. यावर पोलिसांनी परिवार, नातेवाईक आणि गावातील लोकांची चौकशी केली. तेव्हा तपासातून समोर आलं की, मृतक मुलांची काकू अणछी बाईचं मुलांच्या आईसोबत म्हणजे चांदनी बाईसोबत पटत नव्हतं. कौटुंबिक कलहामुळे त्यांची सतत भांडणं होत होती. (हे पण वाचा : धक्कादायक! भरदिवसा डोक्यात दगड घालून युवकाचा खून; चाकणमधील घटना)

अशात २ सप्टेंबरला दुपारी जेव्हा दोन्ही मुलं आईला न सांगता घरातून बाहेर गेले तर आईने त्यांचा शोध सुरू केला होता. यादरम्यान काकू अणछी बाईला दोन्ही मुलं विहिरीजवळ खेळताना दिसले. तर तिने संधी बघत त्या दोघांनाही विहिरीत ढकलून दिलं. ज्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

वाद आणि संपत्तीसाठी हत्या

पोलिसांच्या चौकशीत आरोपी अणछी बाईने सांगितलं की, रोज होणारे वाद आणि मुलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण संपत्ती आपल्या नावावर होईल या लालसेपोटी तिने हत्या केल्याचं कबूल केलं. आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
 

Web Title: Rajasthan : Rajsamand twin brothers murder revealed aunt had taken lives of innocent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.