घातपात की अपघात! दौंडमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 22:00 IST2021-05-13T21:55:30+5:302021-05-13T22:00:59+5:30
Deadbody Found : हा घातपात की अपघात याचा देखील तपास दौंड पोलिसांनी सुरू केला आहे.

घातपात की अपघात! दौंडमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
दौंडमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक तपासानुसार वाहन अपघातामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हा घातपात की अपघात याचा देखील तपास दौंड पोलिसांनी सुरू केला आहे.
दिपमळा समोरून डिफेन्स कॉलनीकडे जाणाऱ्या दुभाजक रस्त्यावर म्हसोबा मंदिरासमोर आज सकाळी हा मृतदेह आढळून आला. घटनेच्या एक दिवसआधी ही व्यक्ती रस्त्याने बडबड करत फिरत असल्याचे काही नागरीकांनी पोलिसांना सांगितले आहे. या अज्ञात मृत व्यक्तीचे वय ३८ ते ४० असून त्याच्या अंगावर फक्त अंडरवेअर आणि एक टॉवेल होता. त्याच्या डोक्याला जखम आहे. तोंडावर रक्ताचे डाग असून खांद्यावर, पायाला, हाताच्या कोपऱ्यांना देखील जखमा पोलिसांना आढळून आल्या आहेत.
अमानवी कृत्य! रुग्णालयात ९० वर्षीय कैद्याला बेडला साखळीने बांधले; जेल वॉर्डरचे केले निलंबन https://t.co/ZgBfu5K3Eg
— Lokmat (@MiLOKMAT) May 13, 2021
ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला त्या परिसरात टवाळखोर आणि तळीरामांची रेलचेल असते. रात्रीच्या सुमारास येथील रस्ता सामसूम असतो. पोलिसांनी घटस्थळाच्या आजूबाजूला संशयित बाबींची पाहणी केली. या घटनेची माहिती मिळताच दौंड ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे, विजय वाघमारे यांनी घटस्थळी भेट दिली. मृतदेह ताब्यात घेवून दौंड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.