anti corruption bureau team raids on acp narasimha reddy residence in hyderabad | बापरे! 15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप

बापरे! 15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप

नवी दिल्ली - तेलंगणामध्येलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) हैदराबादमधील मल्काजगिरी परिसरात राहणाऱ्या एसीपीच्या घरावर छापा टाकला आहे. या कारवाईत तब्बल 70 कोटींहून अधिक अवैध संपत्ती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नरसिम्हा रेड्डी असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. बुधवारी रेड्डी यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला असता हा प्रकार समोर आला आहे. एसीबीकडून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकण्यात येत आहे. 

एसीपी नरसिम्हा रेड्डी याआधी उप्पल पोलीस ठाण्यात निरीक्षक म्हणून कार्यरत होते. नरसिम्हा रेड्डी यांच्या घराशिवाय एसीबीने त्याच्या नातेवाईकांच्या घरी देखील छापा टाकला आहे. तपासात अधिकाऱ्याने बेकायदेशीर मार्गाने जवळपास तब्बल 70 कोटींची संपत्ती जमवल्याचं समोर आलं आहे. घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अनेक मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. हैदराबादमधील वारंगल, जंगगाव, करीमनगर, नलगोंडा जिल्ह्यासह आंध्र प्रदेशातील अनंतपूरम यासह एसीबीने सुमारे 25 ठिकाणी छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिम्हा रेड्डी यांच्या नावे असणाऱ्या संपत्तीची सरकारी किंमत साडे सात कोटींच्या आसपास आहे. मात्र बाजारभावानुसार ही रक्कम 70 कोटींपर्यंत आहे. तपासादरम्यान नरसिम्हा रेड्डी यांच्या नावे अनंतपूरममध्ये 55 एकर शेतजमीन, अनेक प्लॅट्स, 15 लाख रोख रक्कम, दोन बँक लॉकर्स, बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक आणि इतर व्यवसाय असल्याचं समोर आलं. अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वच जण हैराण झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तहसीलदाराच्या घरावर एसीबीचा छापा, घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील एका तहसीलदाराच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा टाकून कारवाई केली होती. त्यामध्ये सबंधित अधिकाऱ्याला 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. बलराजू असं आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून पोलिसांनी लाच घेण्याच्या आरोपाखाली त्यास अटक केली. या तहसीलदाराच्या घरात सापडलेलं पैशाचं घबाड पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे फिरले होते. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात सहकार्य करण्यासाठी तहसिलदाराने ही 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एसीबीच्या पथकाने तहसीलदार बलाराजू नागराजू यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी लाच घेताना रंगेहात त्यांना पकडण्यात आले. तहसीलदारासोबतच एका ग्रामसेवकालाही ताब्यात घेण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; कापली जीभ 

'मी मास्क घालत नाही' म्हणणाऱ्या भाजपा नेत्याचा यू-टर्न, म्हणाले...; Video व्हायरल

"गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण; हेच आहे मोदीजींचं शासन", राहुल गांधींचा घणाघात

लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च

शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स

English summary :
anti corruption bureau team raids on acp narasimha reddy residence in hyderabad

Web Title: anti corruption bureau team raids on acp narasimha reddy residence in hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.