ranchi education minister jagarnath mahto gave car to topper | लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च

लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च

नवी दिल्ली - दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा नेहमीच सत्कार केला जातो. शाळा, विविध राजकीय पक्ष, खासगी क्लासेस यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात येतं. झारखंडच्याशिक्षणमंत्र्यांनी मात्र टॉपर्सना मोठं गिफ्ट दिलं आहे. झारखंडमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये टॉपर्स असलेल्या दोन विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून कार देण्यात आली आहे. झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांना कार भेट देण्यात आली. 

विशेष म्हणजे कारसोबतच  शिक्षणमंत्री जगरनाथ महतो या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचा देखील खर्च करणार आहेत. मनीष कुमार कटियार आणि अमित कुमार अशी टॉपर असलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. निकाल जाहीर झाला त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी टॉपर्सना बक्षिस म्हणून कार देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला आणि कारच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. जगरनाथ महतो यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबतची माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्र्यांनी टॉपर्सना दिली चक्क 'कार' गिफ्ट

"झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक बिनोद बिहारी महतो यांच्या जयंतीनिमित्त दहावीचा टॉपर मनीष कुमार कटियार आणि बारावीचा टॉपर अमीत कुमार अल्टो कार गिफ्ट म्हणून देण्यात आल्या" अशी माहिती जगरनाथ महतो यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना कारच्या चाव्या देतानाचे काही फोटोही ट्विट केले आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा पद्धतीने बक्षिस देण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. यामुळे मुलांना प्रेरणा मिळेल आणि ते परीक्षेत यश संपादन करतील असंही महतो म्हणाले आहेत. 

"टॉपर्सचा सन्मान केल्याने विद्यार्थ्यांना आणखी मेहनत करण्याची मिळते प्रेरणा"

बारावीचा टॉपर असलेल्या अमीत कुमाने जेईई मेन्समध्येही चांगले गुण संपादन केले आहेत. अशा पद्धतीने टॉपरचा सन्मान केल्याने विद्यार्थ्यांना देखील आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं अमितने सांगितलं आहे. दहावीचा टॉपर मनीष कुमार कटियार दरलाघाटचा रहिवासी आहे. त्याने परिक्षेमध्ये  500 पैकी 490 गुण मिळवले आहेत. अभ्यास करून उत्तम यश मिळवलं असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या पालकांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स

टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर? 

काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब 

"मोदींनी काँग्रेसने निर्माण केलेले संबंध संपुष्टात आणले, आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक"

माता न तू वैरिणी! 5 लाखांसाठी अल्पवयीन मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं अन्...

Read in English

English summary :
ranchi education minister jagarnath mahto gave car to topper

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ranchi education minister jagarnath mahto gave car to topper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.