धक्कादायक! मोमोज न मिळाल्यानं तरुण भडकला; लहान मुलावर फेकलं उकळतं तेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 16:25 IST2021-03-02T16:22:29+5:302021-03-02T16:25:46+5:30
आसपास गर्दी असूनही एकानंही आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला नाही; लहान मुलाची प्रकृती स्थिर

धक्कादायक! मोमोज न मिळाल्यानं तरुण भडकला; लहान मुलावर फेकलं उकळतं तेल
नवी दिल्ली: दिल्लीतल्या हैदरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणानं मोमोजच्या दुकानात बसलेल्या लहान मुलावर उकळतं तेल फेकलं. तरुणाला मोमोज न मिळाल्यानं त्यानं हे कृत्य केलं. लहान मुलावर गरम तेल फेकून तरुण तिथून फरार झाला. यावेळी आसपास गर्दी होती. मात्र कोणीही आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. उकळतं तेल अंगावर फेकण्यात आलेल्या मुलाची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्या जीवाला निर्माण झालेला धोका आता टळला आहे.
बापरे! नदीवर म्हशी धूवून परतताना; अचानक मागून आली मगर, काही कळायच्या आतचं घडलं असं....
या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. शालीमार बाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. हैदरपूरमध्ये असलेल्या मोमोज दुकानाचा चालक कामानिमित्त दुकानाच्या बाहेर गेला होता. त्यावेळी त्याचा १२ वर्षांचा पुतण्या दुकानात होता. तिथे आलेल्या एका तरुणानं मोमोज मागितले. त्यावर मी केवळ दुकानावर लक्ष ठेवत आहे. काका आल्यावरच मोमोज मिळतील, असं मुलानं तरुणाला सांगितलं.
खळबळजनक! 'गे' पार्टनरचं लग्न ठरलं; 'या' भीतीने मग जोडीदारालाच संपवलं; पुण्यातील घटना
मुलानं दिलेलं उत्तर ऐकून तरुण संतापला. त्यानं मुलासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. बाजूला कढईत गरम तेल होतं. भडकलेल्या तरुणानं उकळतं तेल मुलाच्या अंगावर टाकलं. गरम तेलामुळे मुलगा भाजला आणि वेदनेनं विव्हळू लागला. ते पाहून आरोपी फरार झाला. कोणीही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. पीडित मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या जीवाला आता धोका नाही. सध्या पोलीस आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.