Crocodile pull a man killed manjeera wild life sangareddy telangana | Crocodile pull a man killed : बापरे! नदीवर म्हशी धूवून परतताना; अचानक मागून आली मगर, काही कळायच्या आतचं घडलं असं....

Crocodile pull a man killed : बापरे! नदीवर म्हशी धूवून परतताना; अचानक मागून आली मगर, काही कळायच्या आतचं घडलं असं....

तेलंगणातील सांगारेड्डी (sangareddy telangana) जिल्ह्यातील मंजीरा वाईल्ड लाईफ सेंच्यूरीजवळील रहिवासी असलेले लोक सध्याच्या काळात खूप  भीतीचं  जीवन  जगत आहेत. आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी प्रशासनाला पाऊलं उचलण्याची विनंती केली आहे.  सांगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी एक काळजाचा धोका चुकवणारी घटना घडली. नदी किनारी आलेल्या एका माणसाला मगरीनं पाण्यात खेचलं आणि जीवघेणा हल्ला केला.

मंडलच्या इसोजीपेटा गावात ही घटना घडली. त्यावेळी ४५ वर्षीय गोल्ला रामुलु नावाचा माणूस आपल्या म्हशींना अंघोळ घालण्यासाठी मंजीरा नदीत घेऊन गेला होता. जेव्हा लोकांनी रामुलु यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला तेव्हा एकच गर्दी जमा झाली.  त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहीजणांना रामुलु यांची मगरीच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला.  पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.  ग्रामस्थांना रामुलु सापडले पण ते मृतावस्थेत होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या मुश्किलीने मगरीच्या तोंडातून रामुलुचे मृत शरीर हाती लागले.

या घटनेनंतर नदी किनारी वास्तव्यास असलेल्या लोकांचा आक्रोश सुरू झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही मगर नदीच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते.  काय सांगता? तोंडावर मिशा उगवल्यामुळे या तरूणीला पुरूष समजताहेत लोक; गर्दीत जाताच होतं असं काही.....

मंजीरा वाईल्ड लाईफ सेंच्यूरी आणि जलाशयाचा भाग मगरीच्या प्रजातींच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आला आहे.  कारण मगरीच्या अनेक प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. २०१७ मध्ये मगरींची मोजणी करण्यात आली होती. त्यावेळी ही संख्या ४३० इतकी होती. दरम्यान या धक्कादायक घटनेत रामुलु यांचा बळी गेल्यामुळे ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.  ९० लाखांचा फ्लॅट घेऊन चोरीसाठी खणलं भुयार; डॉक्टरांच्या घरातून 'अशी' लंपास केली कोट्यांवधींची संपत्ती

Web Title: Crocodile pull a man killed manjeera wild life sangareddy telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.