आंध्र प्रदेशच्या डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातून ऑनर किलिंगची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री मंडपेट मंडळाच्या द्वारपुडी बाहेरील भागातील वेमुलापल्ली गावात ही घटना घडली. आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून भावांनी आपल्या बहिणीच्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेमुलापल्ली येथील ४१ वर्षीय पी.व्ही.व्ही. सूर्यप्रकाश राव यांचा स्थानिक पातळीवर कपड्यांचा व्यवसाय होता. त्यांची पत्नी ऐनविल्ली संध्या या मेडपाडू गावच्या रहिवासी असून त्या सध्या रायवरम येथे डेप्युटी तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. दोघंही एकाच शाळेत शिकत होतं आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
लग्नानंतर काही तासांतच घात
सूर्यप्रकाश आणि संध्या वेगवेगळ्या जातीचे असल्याने संध्याच्या कुटुंबाचा या लग्नाला कडाडून विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोधाला न जुमानता गुरुवारी सकाळी या दोघांनी अन्नवरम येथे लग्न केलं आणि त्यानंतर ते सूर्यप्रकाशच्या वेमुलापल्ली येथील घरी परतले.
हत्येचा कट आणि थरार
बहिणीच्या लग्नाची बातमी समजताच तिचे भाऊ चंद्रपाल आणि गिरिबाबू संतापले. त्यांनी सूर्यप्रकाशचा काटा काढण्याचं ठरवलं. गुरुवारी मध्यरात्री हे दोन्ही आरोपी सूर्यप्रकाशच्या घरी पोहोचले आणि त्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी सूर्यप्रकाशच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात सूर्यप्रकाशचा जागीच मृत्यू झाला.
ग्रामस्थांनी आरोपींना पकडलं
ही घटना घडत असताना स्थानिकांनी पाहिलं आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रपाल व गिरिबाबूला पकडलं. संतप्त ग्रामस्थांनी दोघांनाही चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. घटनेची माहिती मिळताच मंडपेटचे सीआय (CI) आणि एसआय (SI) यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Summary : In Andhra Pradesh, a man was murdered by his wife's brothers for marrying her against their wishes. The woman, a Deputy Tehsildar, and the man, a clothes vendor, had an inter-caste love marriage. The brothers were arrested by police.
Web Summary : आंध्र प्रदेश में, एक व्यक्ति की हत्या उसकी पत्नी के भाइयों ने उसकी मर्जी के खिलाफ उससे शादी करने के लिए कर दी। महिला, एक डिप्टी तहसीलदार, और पुरुष, एक कपड़े विक्रेता, ने अंतरजातीय प्रेम विवाह किया था। भाइयों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया।