प्रेयसी, १३ वर्षीय मुलगा, मुलगी, जावई अन् भावाने मिळून काढला काटा; भांडूपमधील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 13:25 IST2022-07-28T13:23:54+5:302022-07-28T13:25:02+5:30

अवघ्या तीन तासांत गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

an incident of murder of a live-in relationship lover due to alcohol abuse took place In Bhandup | प्रेयसी, १३ वर्षीय मुलगा, मुलगी, जावई अन् भावाने मिळून काढला काटा; भांडूपमधील प्रकार 

प्रेयसी, १३ वर्षीय मुलगा, मुलगी, जावई अन् भावाने मिळून काढला काटा; भांडूपमधील प्रकार 

मुंबई: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून दारूच्या नशेत त्रास वाढल्याने, प्रेयसीसह तिचा १३ वर्षीय मुलगा, मुलगी, जावई, भाऊ यांनी त्याला बॅटने मारहाण करत, हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस चौकशीत समोर आले आहे. अवघ्या तीन तासांत गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

भांडुपच्या राधा कृष्णा चाळ परिसरात एक जण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती भांडुप पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्याला तत्काळ मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आले आहे. चौकशीत मृत व्यक्तीचे नाव विनोद विलास साटम  (३८) असून, तो भांडुपच्या गुरखा चाळीत राहण्यास असल्याचे समोर आले. 

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी बिशनु तेकबहादूर भंडारी (४२) हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. हा गुन्हा अल्पवयीन मुलगा, भाऊ  राजेंद्र तेकबहादूर भंडारी (६०), मुलगी  लक्ष्मी योगेश कदम (२८), जावई योगेश राजू कदम (२५) आणि रिक्षा चालक सतीश प्रेमकुमार प्रयाल (४६) यांनी संगनमत करून, साटमला ठार मारल्याचे सांगितले. 

छळाला कंटाळून उचलले पाऊल-  

साटम हा आरोपी बिशनुसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. तो तिला, तसेच तिच्या मुलास दारूच्या नशेत शारीरिक व मानसिक त्रास, मारहाण, शिवीगाळ करत असल्याने, त्रासाला, छळाला कंटाळून तिने त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली.

Web Title: an incident of murder of a live-in relationship lover due to alcohol abuse took place In Bhandup