फॅक्टरी खरेदीसाठी १ कोटी आण, पत्नीचा छळ; पतीसह ३ जणांवर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: March 7, 2023 15:19 IST2023-03-07T15:07:01+5:302023-03-07T15:19:14+5:30

फिर्यादी श्रावणी यांचे प्रेम याच्यासोबत २०२० मध्ये विवाह झाला.

An anna for factory shopping, wife harassment; Crime against three persons including husband | फॅक्टरी खरेदीसाठी १ कोटी आण, पत्नीचा छळ; पतीसह ३ जणांवर गुन्हा

फॅक्टरी खरेदीसाठी १ कोटी आण, पत्नीचा छळ; पतीसह ३ जणांवर गुन्हा

रुपेश हेळवे

सोलापूर : फॅक्टरी खरेदी करण्यासाठी पत्नीला माहेरून एक कोटी रुपये घेऊन ये म्हणत तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी श्रावणी प्रेम पोटाबत्ती ( वय २८, रा. श्रध्दा अपार्टमेंट, पद्मा नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रेम श्रीनिवास पोटाबत्ती, सासू ज्योती पोटाबत्ती, श्रीनिवास पोटबत्ती ( सर्व रा. सृष्टी नगर, अक्कलकोट रोड) यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी श्रावणी यांचे प्रेम याच्यासोबत २०२० मध्ये विवाह झाला. दोघेही आयटी कंपनीमध्ये स्वॉफ्टवेअर इंजिनिअर होते. लग्नानंतर आराेपी प्रेमने श्रावणी यांना पॉवरलूम फॅक्टरी खरेदी करण्यासाठी एक कोटी रुपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ करत होता. शिवाय तु मला पसंद नव्हती, तुझा पगार व तुझ्या वडिलांची आम्हाला आर्थिक मदत होईल म्हणून मी तुझ्याशी लग्न केले, असे म्हणत शारीरिक व मानसिक त्रास देत होते. माहेरून पैसे घेऊन आणल्याशिवाय आम्ही नीट नांदवणार नाही, असे म्हणत त्यांना त्रास दिला. याप्रकरणी वरील तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास हवालदार साळुंखे करत आहेत.

Web Title: An anna for factory shopping, wife harassment; Crime against three persons including husband