8 वर्षाच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ केली पोस्ट, दिवसाढवळ्या वडिलांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:13 IST2022-06-28T19:08:06+5:302022-06-28T19:13:54+5:30
Nupur Sharma : या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

8 वर्षाच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ केली पोस्ट, दिवसाढवळ्या वडिलांची हत्या
राजस्थानमधील उदयपूर शहरातील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीट येथे भरदिवसा तीन जणांनी एका व्यक्तीचा गळा चिरून खून केला. मृत तरुणाच्या 8 वर्षाच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. याचा राग येऊन आरोपीने वडिलांची निर्घृण हत्या केली.
या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इंटरनेट बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पुढील २४ तास इंटरनेट बंद राहणार आहे. माहिती मिळताच धानमंडी व घंटाघर पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी मृतदेह एमबी हॉस्पिटलच्या शवागारात ठाण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कन्हैयालालच्या आठ वर्षीय मुलाने मोबाईलवरून नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यानंतर काही लोक संतापले आणि दोन आरोपींनी धारदार शस्त्राने त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर हिंदू संघटनेत संताप पसरला आहे. दोन मुस्लिम आरोपींनी तलवारीने गळा चिरून युवकाची हत्या केली. या प्रकरणी आरोपींनी व्हिडीओ जारी करून हत्येची जबाबदारीही स्वीकारली आहे. असे कृत्य पुन्हा होऊ नये म्हणून मारेकऱ्यांना फाशी द्यावी, असे लोकांचे म्हणणे आहे. तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी या घटनेनंतर मालदास गली परिसरातील दुकाने बंद ठेवली आहेत.