सतर्क नागरिकाने गर्दुल्ल्यांना केले पोलिसांच्या हवाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 23:48 IST2018-08-21T21:16:32+5:302018-08-21T23:48:45+5:30
१०० या क्रमांकावर संपर्क साधत पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे व्यसन जडविणाऱ्या तिघांना पोलिसांच्या हवाली केले.

सतर्क नागरिकाने गर्दुल्ल्यांना केले पोलिसांच्या हवाली
मुंबई - बोरिवली येथील शिवाजी नगर परिसरातील एमएम मेडिकल सेंटरनजीक रिक्षामध्ये शाळकरी विद्यार्थी गांजा आणि चरस यांना आहारी जाताना एका सतर्क नागरिकाने पाहिले आणि १०० या क्रमांकावर संपर्क साधत पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे व्यसन जडविणाऱ्या तिघांना पोलिसांच्या हवाली केले.
रॉयल ऍम्ब्युलन्समध्ये काम करणाऱ्या मोहसीन या तरुणाला कामाला जात असताना एमएम मेडिकल सेंटरनजीक ५ शाळकरी मुलं रिक्षात तीन गर्दुल्ल्यासोबत चरस आणि गांजा सेवन करत असल्याचे दिसले. ६ आणि ७ इयत्तेत शिकणारी मुलं अमली पदार्थ सेवन करतात हे पाहून मोहसिनला धक्का बसला आणि त्याने १०० क्रमांकावर कोळ करून पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. काही वेळातच मोबाईल व्हॅन आली आणि तीन गर्दुल्ल्यांना एमएचबी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. शाळकरी मुलांनी मात्र पळ काढला अशी माहिती मोहसीनने दिली. तिघांना शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. याप्रकरणी पुढे काय झाले माहित नसल्याचे मोहसीनने सांगितले. मात्र, मोहसीनच्या सतर्कतेमुळे तीन अमली पदार्थ सेवन करणारे आणि पुरविणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.