नागपुरात पोटच्या मुलीला भोसकणारा मद्यपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:16 AM2020-02-14T00:16:49+5:302020-02-14T00:17:53+5:30

तीन दिवसापूर्वी पोटच्या मुलीला भोसकून पळून गेलेला दारुड्या आरोपी अखेर पाचपावली पोलिसांच्या हाती लागला.

An alcoholic Gajaad who seduces a pot girl in Nagpur | नागपुरात पोटच्या मुलीला भोसकणारा मद्यपी गजाआड

नागपुरात पोटच्या मुलीला भोसकणारा मद्यपी गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देतीन दिवसापासून होता फरार : पाचपावली पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन दिवसापूर्वी पोटच्या मुलीला भोसकून पळून गेलेला दारुड्या आरोपी अखेर पाचपावली पोलिसांच्या हाती लागला. दिनेश पांडुरंग बुरडे (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे.
पाचपावलीच्या कुºहाडकर पेठेत राहणारा आरोपी दिनेश बुरडे हा अट्टल मद्यपी आहे. तो आधी पेंटींगचे काम करायचा. आता एखादवेळी पेंटींगचे काम करतो पैसे मिळाल्यानंतर दारूत उडवतो आणि घरात नेहमी वाद घालतो. १० फेब्रुवारीला त्याने अशाच प्रकारे दारूच्या नशेत स्वत:च्या भावासोबत वाद घातला. दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४५ ला पुन्हा तो दारू पिऊन आला आणि पत्नीसोबत भांडू लागला. पत्नीने त्याला रोज रोज दारू पिऊन भांडण करायचे असेल तर यापुढे घरी यायचे नाही, असे बजावले. त्यामुळे आरोपी चिडला आणि त्याने घरातील टीव्ही खाली पटकला. भांडेही इकडे तिकडे फेकू लागला. त्याच्याकडून आदळआपट केली जात असल्याचे पाहून पत्नी वर्षा बुरडेने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता तिला तो मारहाण करू लागला. त्याने चाकूही हातात घेतला. ते पाहून त्याची मुलगी निशा (वय १७) आईच्या बचावासाठी धावली. आरोपीने मुलीच्या पोटात चाकूने भोसकले. तिला गंभीर जखमी करून आरोपी पळून गेला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी निशाला उपचारासाठी मेयोत दाखल केले. वर्षा बुरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हवलदार अनिरुद्ध मेश्राम यांनी कलम ३२६ भादंवि अन्वये आरोपी दिनेश बुरडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तीन दिवसांपासून त्याची शोधाशोध केल्यानंतर तो गुरुवारी रात्री पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: An alcoholic Gajaad who seduces a pot girl in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.