शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

Goodwin Jewellers Case : अकराकरण बंधुंची केरळमध्ये आढळली ५० कोटींची मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 05:45 IST

Goodwin Jewellers Case : गुडविन फसवणूक प्रकरण : दोन मर्सिडीजसह १० वाहने, मॉल, बंगल्यांसह ९० एकरची जमीन

जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ भागांतील सुमारे १२०० गुंतवणूकदारांची २५ कोटींची फसवणूक करणाऱ्या ‘गुडविन ज्वेलर्स’च्या सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण यांची केरळसह इतर ठिकाणी ५० कोटींच्या २१ मालमत्ता आढळल्या आहेत. त्यातील बहुतांश मालमत्ता जप्त केल्या असून वर्षभरात त्यांच्या लिलावातून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करता येऊ शकतील, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली.


ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस उपायुक्त संजय जाधव आणि सहायक आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव, नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, शंकर चिंदरकर आणि वनीता पाटील आदींचा समावेश होता. महाराष्टÑात फसवणुकीनंतर अकराकरण बंधूंनी केरळातील त्रिशूर जिल्ह्यात जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदीमध्ये मोठी गुंतवणूक केली.

केरळमध्येच त्यांची एक तीन मजली इमारत आहे. याशिवाय, आलिशान मॉल, सुमारे ९० एकर जमीन, बंगले, रिसॉर्ट अशा ४० ते ५० कोटींच्या २१ मालमत्ता आढळल्या आहेत. यातील अनेक मालमत्तांची त्यांच्याच नातेवाइकांच्या मदतीने खातरजमा केल्यानंतर त्या सीलबंद केल्या आहेत. दोन मर्सिडीज कारसह फॉर्च्युनर, इनोव्हा अशा दीड ते दोन कोटींच्या १० कारचाही त्यामध्ये समावेश आहे. बँकेतही दीड कोटींची रक्कम आढळली असून ती खातीही गोठविली आहेत. ठाण्यातील नौपाडा, डोंबिवलीतील मानपाडा, अंबरनाथच्या शिवाजीनगर या पोलीस ठाण्यांमध्ये ११५४ गुंतवणूकदारांची त्यांनी २५ कोटींची फसवणूक केल्याचे आढळले. मात्र, पालघर, नवी मुंबई, पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि ठाणे ग्रामीण अशा विविध ठिकाणीही या ज्वेलर्सने तीन ते चार हजार गुंतवणूकदारांची ९० कोटींपेक्षा अधिक फसवणूक केली.

कोठडीत वाढ करण्याची मागणी
सुरुवातीला ठाणे पोलिसांना त्यांची २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, परंतु त्यांच्या मालमत्तांची, तसेच यातील आणखी फरारी आरोपींची माहिती मिळविण्यासाठी अकराकरण बंधुंच्या पोलीस कोठडीमध्ये आणखी वाढ करण्यासाठी ठाणे न्यायालयाकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून मागणी केली जाणार आहे. ती मिळाल्यानंतर इतरही जिल्ह्यातील पोलीस त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Goodwin Jewellersगुडविन ज्वेलर्स