शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

संतापजनक! जाडी अन् सावळी असल्याचं कारण देत पत्नीला सोडलं; गर्लफ्रेंडशी तुलना करत म्हणायचा.....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 8:18 PM

Man beats abandons wife for not being slim and fair२३ वर्षीय  महिला शनिवारी  पोलिस स्थानकात पोहोचली आणि पतीनं मारहाण केल्याची तक्रार दाखल केली.  

गुजरातच्याअहमदाबादमधील एका माणसानं आपल्या पत्नीला घटस्फोट दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बायको जाडी आणि सावळ्या रंगाची असल्यामुळे त्यानं घटस्फोट दिल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण घाटलेदिया परिसरातील असून येथील महिलेनं आपल्या पतीविरुद्ध पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

महिलेनं तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार  गोरी, स्लिम आणि सुंदर नसल्यामुळे तिच्या पतीनं तिला सोडलं आहे. २३ वर्षीय  महिला शनिवारी  पोलिस स्थानकात पोहोचली आणि पतीनं मारहाण केल्याची तक्रार दाखल केली.  सदर घटनेतील तक्रारदार महिलेचं लग्न २००८ मध्ये झाल होतं. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार तिचा पती आणि सासरची मंडळी त्रास  देत असल्यामुळे तिला हे पाऊल उचलावं लागलं.

Sachin Vaze: सचिन वाझे ‘या’ आजाराने त्रस्त; जे. जे हॉस्पिटलचा मेडिकल रिपोर्ट समोर, उपचार सुरू

पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या एका महिन्यानंतर तिचा पती आणि सासरकडची मंडळी तिला हुंड्यासाठीसुद्धा त्रास  देत होते. आई वडिल पैसे देण्यासाठी असमर्थ असल्यानं कोणताही मार्ग या महिलेकडे नव्हता. त्यावेळी लहान सहान गोष्टींवरून त्यांनी तिला मारहाण करायला सुरूवात केली.

क्रूरतेचा कळस! दारूसाठी पैसे न दिल्याने कापले पत्नीचे ओठ आणि नाक, घटनेने खळबळ

महिलेनं सांगितले की, ''माझे पती, मी सावळी,  जाड असण्यावरून टोमणे मारायचे.  कारण त्यांची गर्लफ्रेंड सुंदर, बारिक आणि देखणी होती.  त्यांनी माझ्या सासरच्या कुटुंबाच्या सदस्यांनीही पतीला मारहाण करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. मी अपशकूनी असल्याचं सांगत बाळाला जन्म देऊ शकत नाही असं बोलायचेत. इतकंच नाही तर जेवणात काही कमी जास्त झालं तरिही मला त्रास द्यायचे.'' महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी तक्रार नोंदवून  घेतली असून आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.  

दारूसाठी पैसे न दिल्याने कापले पत्नीचे ओठ आणि नाक

राजस्थानच्या जोधपूरमध्ये नशेत असलेल्या पतीने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीचं नाक आणि ओठ कापल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दारूसाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून नवराने टोकाचं पाऊल उचलत पत्नीवर अशा प्रकारे हल्ला केला आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेने रुग्णालयातूनच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या प्रतापनगर परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय महिलेने स्वतः पोलिसांना याबाबत माहिती दिली. पती सकाळपासून रात्रीपर्यंत दारू पितो. संध्याकाळी त्याने दारूसाठी काही पैसे मागितले. तेव्हा महिलेने त्याला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून तो प्रचंड चिडला आणि संतापाच्या भरात धारदार शस्त्राने त्याने तिच्या नाकावर आणि ओठांवर वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. बाबूलाल असं पतीचं नाव आहे.

बाबूलाल याने महिलेला सोडले होते. गेल्या काही दिवसांपासून महिला अन्य एका व्यक्तीसोबत राहत होती. त्या व्यक्तीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर बाबुलाल पुन्हा तिच्यासोबत राहू लागला. दारू पिऊन तो तिला मारहाण करत असे. याच दरम्यान त्याने महिलेच्या नाकावर आणि ओठांवर वार केले. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGujaratगुजरातahmedabadअहमदाबाद