शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

मांत्रिकाकडून होणार होती अघोरी पूजा; मध्य प्रदेशातील दोन अपहरणकर्ते जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 9:12 PM

Crime News : नरबळीसाठी चेन्नईतील चिमुकल्याचे अपहरण : चिमुकला सुखरूप, नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग कारवाई

ठळक मुद्देट्रेन नंबर ०२६२१ च्या कोच नंबर डीएल-१ मध्ये ९ आणि १० क्रमांकाच्या बर्थवर दोन आरोपी चेन्नई तमिळनाडू येथून बसले असून, ते चार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याला इटारसीला घेऊन जात असल्याची माहिती चेन्नई लोहमार्ग पोलिसांनी नागपूरच्या रेल्वे पोलीस नियंत्र

नागपूर : अघोरी पूजेसाठी मांत्रिकाच्या सल्ल्यावरून चार वर्षीय चिमुकल्याचे तमिळनाडूतून अपहरण करून मध्य प्रदेशकडे निघालेल्या दोन भामट्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. मोनू गरीबदास केवट (वय २६, रा. कोलार महंत, ता. बरेली, जि. रायसेन) आणि शिब्बू गुड्डू केवट (२२, रा. बोरासधाट, ता. उदयपुरा, जि. रायसेन, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्या ताब्यातून चिमुकल्याची सुटका करण्यात आली. तो सुखरूप आहे. या अपहरणकांडातील चिमुकल्याची नरबळीपूर्वीची पूजा होणार होती, अशी खळबळजनक माहिती आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून उघड झाल्याने खुद्द पोलीसही हादरले आहेत.

ट्रेन नंबर ०२६२१ च्या कोच नंबर डीएल-१ मध्ये ९ आणि १० क्रमांकाच्या बर्थवर दोन आरोपी चेन्नई तमिळनाडू येथून बसले असून, ते चार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याला इटारसीला घेऊन जात असल्याची माहिती चेन्नई लोहमार्ग पोलिसांनी नागपूरच्या रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यावरून निरीक्षक आर. एल. मीना, सहायक उपनिरीक्षक सुहासिनी लादे, त्यांचे सहकारी तसेच लोहमार्ग पोलिसांच्या निरीक्षक मनीषा काशीद आपल्या सहकाऱ्यांसह फलाट क्रमांक एकवर कारवाईसाठी सज्ज झाल्या. दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी रेल्वे नागपूर रेल्वे स्थानकावर येताच संबंधित कोचला पोलिसांनी चोहोबाजूने घेरून तपासणी केली. नऊ आणि दहा क्रमांकाच्या आसनावर संशयित आरोपीचिमुकल्यासोबत बसून होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे तसेच चिमुकल्याचा फोटो व्हाॅट्सॲपवरून चेन्नई पोलिसांना पाठविण्यात आला. अपहरण करण्यात आलेला हाच तो बालक आणि हेच आरोपी असल्याचे चेन्नई पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली.चिमुकला आई-वडिलांच्या ताब्यात

आरोपींच्या ताब्यातील बालक अतिशय घाबरलेले होते. पोलिसांनी लगेच चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून बालकाला त्यांच्या स्वाधीन केले. दरम्यान, तमिळनाडू (चेन्नई) पोलीस आणि चिमुकल्याचे पालक सोमवारी दुपारी नागपुरात पोहोचले. लोहमार्ग पोलिसांनी चिमुकल्याला छानसे गिफ्ट देऊन त्याच्या पालकांच्या हवाली केले. रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्डेय तसेच लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा काशीद, उपनिरीक्षक विजय तायवाडे, ओमप्रकाश भलावी, सहायक फौजदार कुवर, हवालदार ऊके, नायक मिश्रा, शिपाई घुरडे, खवसे, नरूले, मोगरे तसेच महिला शिपाई नेवारे यांनी ही कारवाई केली.तामिळनाडू पोलिसांची तत्परता

आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी असून गेल्या तीन वर्षांपासून ते रोजगाराच्या निमित्ताने चेन्नईतील अंबतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. नमूद बालकाचे पालक मूळचे बिहारमधील रहिवासी असून, रोजगाराच्या निमित्ताने ते अंबतूर परिसरात राहते. आरोपी बाजुलाच राहत असल्याने या बालकाला ते कधी चॉकलेट तर कधी खाऊ घेऊन द्यायचे. त्यामुळे चिमुकला त्यांच्या अंगावर होता. बालकाच्या आईवडिलांचाही आरोपींवर विश्वास होता. त्यामुळे त्याला शनिवारी आरोपींनी सोबत नेले. तेव्हा नेहमीप्रमाणे चॉकलेट वगैरे घेऊन ते परत येतील, असे पालकांना वाटले होते. मात्र आरोपींनी विश्वासघात करून बालकाचे अपहरण केले. सायंकाळ झाली तरी ते परत आले नाहीत. त्यामुळे घाबरलेल्या बालकाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. चिमुकल्याचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच चेन्नई पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवली. रेल्वे स्टेशनवरचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यातून आरोपी नमूद क्रमांकाच्या ट्रेनमध्ये बसल्याचे दिसून आले. त्या डब्यातील पीएनआर नंबर तपासून पोलिसांनी तातडीने सर्वत्र वायरलेस संदेश दिला. नमूद रेल्वेगाडी नागपूर मार्गे मध्य प्रदेशात जाणार असल्याचे लक्षात येताच चेन्नई पोलिसांनी नागपूर लोहमार्ग पोलिसांना माहिती कळविली आणि त्याचमुळे नागपुरात पोलिसांना अपहरणकर्त्यांना ताब्यात घेणे सहज शक्य झाले. दरम्यान, आज तामिळनाडू पोलीस नागपुरात पोहचले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी न्यायालयातून त्यांचा ट्रान्झिट रिमांड मिळवला. रात्री त्यांना चेन्नईला नेण्याची पोलिसांची तयारी होती.मुंडन न झालेले बालक आणण्याचा मांत्रिकाचा सल्लाआरोपींनी या अपहरणाच्या गुन्ह्याचा उद्देश प्राथमिक चौकशीत सांगितला. तो ऐकून पोलीस काही वेळेसाठी शहारले. दोनपैकी एका आरोपीला मूलबाळ नाही. त्यामुळे त्याच्या गावातील मांत्रिकाने त्याला मूलबाळ होण्यासाठी मुंडण न झालेला (केस न कापलेला) बालक पूजेसाठी आणल्यास तुला मूलबाळ होतील, असे सांगितले होते. त्यावरून आरोपीने या चिमुकल्याचे अपहरण केल्याची कबुली दिली. गावात नेल्यानंतर अघोरी पूजा किंवा नरबळीसाठी चिमुकल्याचा वापर केला जाणार होता, हे आरोपीच्या प्राथमिक चौकशीतून उघड झाल्याने काही क्षणासाठी पोलीसही शहारले. या कारवाईमुळे एक मोठा गुन्हा टळला, अशी माहिती रेल्वे पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :ArrestअटकnagpurनागपूरMadhya Pradeshमध्य प्रदेशKidnappingअपहरणPoliceपोलिस