ख्रिसमस पार्टीवरून घरी परतली अन् घरून फोन आला, तरुणीची १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 18:44 IST2021-12-27T18:43:45+5:302021-12-27T18:44:53+5:30
Suicide Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला शेवटचा फोन तिच्या घरातून आला होता. त्यानंतर तिने आपले आयुष्य संपवले. पोलिसांनी केनिया दूतावासालाही या घटनेची माहिती दिली आहे.

ख्रिसमस पार्टीवरून घरी परतली अन् घरून फोन आला, तरुणीची १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
ग्रेटर नोएडातील बीटा-2 पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या कासा ग्रँड सोसायटीच्या १४व्या मजल्यावरून पडून केनियन तरुणीचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुलगी ख्रिसमस पार्टीत सहभागी होऊन घरी परतली होती. चार दिवसांपूर्वी मूयासा या आपल्या मित्राला भेटण्यासाठी केनियाहून ती ग्रेटर नोएडा येथे आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला शेवटचा फोन तिच्या घरातून आला होता. त्यानंतर तिने आपले आयुष्य संपवले. पोलिसांनी केनिया दूतावासालाही या घटनेची माहिती दिली आहे.
बीटा-2 पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या कासा ग्रँड सोसायटीमध्ये अनेक आफ्रिकन वंशाचे लोक राहतात. केनियाची रहिवासी असलेली मुयासा ही चार दिवसांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर ग्रेटर नोएडा येथे सोसायटीच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नायजेरियन नागरिक असलेल्या तिच्या मित्राला भेटण्यासाठी आली होती.
बंदुकीचा धाक दाखवून पोलिसाने केला बलात्कार, महिलेने केला खळबळजनक आरोप
रविवारी पहाटे ५ वाजता ही घटना घडली
पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तपास केला असता शनिवारी रात्री या तरुणीने आपल्या मित्र आणि मैत्रिणीसोबत ख्रिसमसच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्याचे आढळून आले. घटनेपूर्वी मुलीचे कुटुंबीयांशी मोबाईलवर बोलणे झाले होते.
स्टेशन प्रभारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. शनिवारी रात्री ख्रिसमस पार्टीत सहभागी झाल्याची माहिती तरुणीच्या मित्राने आणि मैत्रिणीने दिली आहे. केनियातून कुटुंबीयांचा फोन आल्यानंतरच मुलीने आपलं आयुष्य संपवले.