बंदुकीचा धाक दाखवून पोलिसाने केला बलात्कार, महिलेने केला खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 01:40 PM2021-12-27T13:40:35+5:302021-12-27T13:40:55+5:30

Rape Case : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने २०१९ मध्ये दुसर्‍या पुरुषाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती, ज्याने आपली ओळख खोटी करून तिचे अपहरण केल्याचा दावा तिने केला होता. पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.

Police rape a woman on a gunpoint, a woman makes a sensational allegation | बंदुकीचा धाक दाखवून पोलिसाने केला बलात्कार, महिलेने केला खळबळजनक आरोप

बंदुकीचा धाक दाखवून पोलिसाने केला बलात्कार, महिलेने केला खळबळजनक आरोप

googlenewsNext

लखनऊ - गेल्या दोन वर्षांपासून आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे आणि ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार एका २८ वर्षीय महिलेने केल्यानंतर मुरादाबादमध्ये ३१ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. 

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने एका स्थानिक तरुणाविरुद्ध अपहरण आणि बलात्काराच्या तक्रारीच्या संदर्भात चौकशी करण्याच्या बहाण्याने दोन वर्षांपूर्वी जेव्हा तो तिच्या घरी गेला तेव्हा कॉन्स्टेबलने प्रथम बंदुकीच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी सांगितले की, महिलेने पोलीस कॉन्स्टेबलने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याने तिने त्यावेळी तक्रार दाखल केली नाही असा दावा केला आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. “गेल्या आठवड्यात पीडितेला समजले की, आरोपी विवाहित आहे आणि त्याला पाच वर्षांचा मुलगा आहे. पीडितेचा दावा आहे की, जेव्हा तिने कॉन्स्टेबलला याबाबत विचारले तेव्हा त्याने तिला या प्रकरणाबद्दल कोणाशीही बोलू नये अशी धमकी दिली,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

महिलेने तिची तक्रार घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि शनिवारी बलात्कार आणि धमकीच्या आरोपाखाली कॉन्स्टेबलविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. “आम्ही उद्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचे जबाब नोंदवू. पुरावे तपासल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. आरोपी हवालदाराची नुकतीच मुरादाबादहून बलिया येथे बदली करण्यात आली आहे,” असे पोलीस अधिकारी म्हणाले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने २०१९ मध्ये दुसर्‍या पुरुषाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती, ज्याने आपली ओळख खोटी करून तिचे अपहरण केल्याचा दावा तिने केला होता. पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.

महिलेच्या म्हणण्यानुसार, तक्रार दाखल केल्यानंतर काही दिवसांनी आरोपी कॉन्स्टेबलने तिच्याशी संपर्क साधला होता. त्याने कथितरित्या तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि प्रकरणाची माहिती गोळा करण्याच्या बहाण्याने तिला अनेकदा फोन करून घरी भेटण्यास येत असे. पीडितेचा दावा आहे की, डिसेंबर २०१९ मध्ये ती एकटी असताना हवालदार तिच्या घरी आला. आपल्याजवळ असलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलाची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. तो पीडितेच्या घरी एक रात्र राहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Police rape a woman on a gunpoint, a woman makes a sensational allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.