लग्नानंतर पती तयार करत होता पोर्न व्हिडिओ, लॅपटॉप पाहून पत्नीच्या पायाखालची जमीनच घसरली अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 16:53 IST2022-08-06T16:52:12+5:302022-08-06T16:53:56+5:30
एका 30 वर्षीय तुरणीला ऑनलाइन प्रेम व्यक्त करून लग्न करणे अतिशय महाग पडले आहे...

लग्नानंतर पती तयार करत होता पोर्न व्हिडिओ, लॅपटॉप पाहून पत्नीच्या पायाखालची जमीनच घसरली अन् मग...
मध्य प्रदेशातील चंबळमधील भिंड जिल्ह्यातील एका तुरणीला ऑनलाइन प्रेम व्यक्त करून लग्न करणे प्रचंड महागात पडले आहे. संबंधित तरूण गुजरातमधील भिंड येथून तिला भेटण्यासाठी गेला होता. या दोघांनी 2022 मध्ये लग्न केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे, लग्नानंतर संबंधित तरुणाने तरुणीचे पोर्न व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. लग्नानंतर संबंधित तरुण, सेक्सदरम्यान व्हिडिओ रेकॉर्ड करून पोर्न फिल्म तयार करतो, असा गंभीर आरोप तरुणीने केला आहे. तिच्या तक्रारीवरून महिला पोलीस ठाण्यात पती विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून त्याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंबळमधील भिंड येथे राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये राहणाऱ्या मितुल डोसी नावाच्या युवकासोबत तिची ऑनलाईन मैत्री झाली. यानंतर दोघांनीही ऑनलाईनच एकमेकांप्रती आपले प्रेम व्यक्त केले. यानंतर संबंधित तरुणी तरुणीला भेटण्यासाठी गुजरातमधून भिंड येथे गेला होता. यानंतर या दोघांनी लग्न केले होते.
लॅपटॉपमध्ये आढळले अनेक मुलींचे पॉर्न व्हिडिओ -
पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर तो जेव्हा-जेव्हा शारीरिक संबंध प्रस्थापित करतो, तेव्हा तेव्हा व्हिडिओ तयार करतो. एवढेच नाही, तर पीडित तरुणीने जेव्हा तिच्या पतिचा लॅपटॉप बघितला, तेव्हा तिला धक्काच बसला, असेही तरुणीनीने म्हटले आहे. तसेच, त्याच्या कंप्यूटरमध्ये एक डझनवर मुलींचे पोर्न व्हिडिओ आढळले आहेत. पीडित तुरुणीने याला अनेक वेळा विरोध केला, मात्र, संबंधित तरुण म्हणजेच तिचा पती तिला जीवे मारण्याची धमकी देतो. तसेच तिला मारहाणही करतो. अखेर संबंधित तरुणीने पतिच्या या त्रासाला कंटाळून महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिला आहे. यानंतर आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.