शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

काला जथेडीनंतर कुख्यात गँगस्टर टुंडा बोहल्यावर चढणार; आज प्रेयसीसोबत बांधणार लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 3:15 PM

तिहार तुरुंगात कैद असलेला गँगस्टर योगेश टुंडा आज आपल्या प्रेयसीसोबत लग्न करणार आहे.

नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ ​​काला जथेडीच्या लग्नानंतर आता आणखी एक गँगस्टर बोहल्यावर चढणार आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद असलेला कुख्यात गँगस्टर योगेश टुंडाचे लग्न होणार आहे. योगेश टुंडा आज(शुक्रवार) आपल्या प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकणार असून त्यासाठी त्याला कोर्टाने त्याला 6 तासांचा पॅरोल मंजूर केला आहे. दिल्लीतील विकासपुरी येथील आर्य समाज मंदिरात टुंडाचे लग्न होईल. काला जथेडीप्रमाणे योगेश टुंडाला कडेकोट बंदोबस्तात आर्य समाज मंदिरात आणण्यात आले आहे.

टिल्लू ताजपुरियाची हत्येचा सूत्रधारकाही महिन्यांपूर्वी तिहार तुरुंगात कुख्यात गँगस्टर सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरियाची निर्घृण हत्या झाली होती, या हत्येचा सूत्रधार योगेश टुंडा आहे. टुंडाने त्याच्या दोन साथीदारांसोबत टिल्लू ताजपुरियावर हल्ला चढवला होता. ही हत्या इतकी निर्घृण होती की, या हत्याकांडाचा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून अवघात देश हादरला होता. गँगस्टर जितेंद्र गोगी याची न्यायालयात ​​टिल्लू ताजपुरियाने हत्या केली होती. याचा बदला घेण्यासाठी टुंडा आणि त्याच्या साथीदारांनी तुरुंगात टिल्लूची हत्या केली.

काला जथेडीचे कडक बंदोबस्तात लग्नदोन दिवसांपूर्वीच दिल्ली-हरियाणातील अनेक गंभीर गुन्ह्यांत सामील असलेला कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ ​​काला जथेडीचा लेडी डॉन मॅडम मिंझ उर्फ अनुराधा चौधरीशी द्वारका येथील एका मॅरेज हॉलमध्ये विवाह झाला. त्यांच्या लग्नासाठी संपूर्ण परिसराचे छावणीत रुपांतर करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 100 हून अधिक पोलीस आधुनिक शस्त्रास्त्रांसह तैनात करण्यात आले आहेत. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंगmarriageलग्न