२ कोटींच्या दरोड्यातील मुख्य सुत्रधार ४ वर्षांनी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 11:58 AM2019-09-04T11:58:02+5:302019-09-04T11:59:27+5:30

याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी ११ जणांना अटक केली होती़. मात्र, संजय गंभीर हा मुख्य सुत्रधार पोलिसांच्या हाती लागत नव्हता़.

After 2 years the thief who theft 2 crore | २ कोटींच्या दरोड्यातील मुख्य सुत्रधार ४ वर्षांनी जाळ्यात

२ कोटींच्या दरोड्यातील मुख्य सुत्रधार ४ वर्षांनी जाळ्यात

Next

पुणे : सेनापती बापट रोडवरील लाईफ जनरल इन्श्युरन्स कंपनीवर दरोडा टाकून २ कोटी रुपये चोरुन नेणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराला तब्बल ४ वर्षांनी पकडण्यात पुणेपोलिसांना यश आले आहे़. संजय चंद्रकांत गंभीर असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी ११ जणांना अटक केली होती़. मात्र, संजय गंभीर हा मुख्य सुत्रधार पोलिसांच्या हाती लागत नव्हता़.


गुन्हे शाखेकडून पुणे शहरातील फरार आरोपींच्या शोधाकरिता सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक स्थापन केले आहे़. या पथकातील पोलीस  नाईक महेश निंबाळकर यांना संजय गंभीर हा बाणेर रोडवरील सकाळनगरमधील हॉटेल चारुज येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन महेश निंबाळकर व संभाजी नाईक यांनी हॉटेल चारुजवर सापळा रचून त्याला पकडले़. चौकशीत त्याने गुन्हा कबुल केला.
लाईफ जनरल इन्श्युरन्स अँड ब्रोकरेज या सेनापती बापट रोडवरील कंपनीचे मालक साईराम अय्यर यांनी कंपनीच्या कामासाठी मुंबईला ऑफिस घ्यायचे होते़. त्याच्या व्यवहारासाठी १ जून २०१५ रोजी २ कोटी रुपयांची रक्कम ऑफिसमध्ये आणली होती़. ऑफिसमधील सेल्स कर्मचारी मनोज एलपूर (रा़ पिंपरी) याला माहिती होती़. त्याने मित्रांच्या मदतीने ही रक्कम चोरीचा कट आखला़. ९ जून २०१५ रोजी सायंकाळी धाडसी दरोडा टाकून ऑफिसमधील १ कोटी ९७ लाखांची रोकड चोरुन नेली होती़. चतु:श्रृंगी पोलिसांनी मनोज एलपूर, चंद्रकांत बेलवटे(रा़. चिंचवड), अमित सांगळे (रा़. निगडी) व इतर आठ अशा ११ जणांना अटक केली होती़. दरोडा टाकल्यानंतर संजय गंभीर फरार झाला होता़. 
संजय गंभीर याच्यावर यापूर्वी बॅक ऑफ महाराष्ट्रकडे जप्त केलेल्या मालमत्ता निम्या किंमतीत मिळवून देतो, असे सांगून १० साथीदारांसह नागरिकांना २ कोटी रुपयांची फसवणूक केली होती़. याप्रकरणी २०१२ मध्ये त्याला अटक झाली होती़ याशिवाय २०११ मध्ये टेक महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून लोकांकडून पैसे धेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल आहे़.  या गुन्ह्यात संजय गंभीर गेली ९ वर्षे फरार आहे़. 
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त डॉ़. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश निंबाळकर, संभाजी नाईक, महेश पवार यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: After 2 years the thief who theft 2 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.