अश्लील व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये महिलेला अॅड केल्याने अॅडमिनला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 22:10 IST2018-11-27T22:09:48+5:302018-11-27T22:10:16+5:30

अॅडमिन मुश्ताक अली शेख( वय २४) हा पश्चिम बंगालमधील एक कारपेन्टर आहे. कामाच्या शोधात तो मुंबईत आला होता. त्याने ट्रिपल एक्स नावाचा एक व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला होता.

Adhin was arrested by adding a woman to the porn Whitswap group | अश्लील व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये महिलेला अॅड केल्याने अॅडमिनला अटक 

अश्लील व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये महिलेला अॅड केल्याने अॅडमिनला अटक 

मुंबई - पॉर्नोग्राफिक कन्टेन्ट शेअर होत असलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये एका महिलेला तिची परवानगी घेतल्याशिवाय अॅड केल्यामुळे ग्रुप अॅडमिनला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने मुंबईच्या आयटी सेलकडे या ग्रुपबाबत तक्रार केली होती. अॅडमिन मुश्ताक अली शेख( वय २४) हा पश्चिम बंगालमधील एक कारपेन्टर आहे. कामाच्या शोधात तो मुंबईत आला होता. त्याने ट्रिपल एक्स नावाचा एक व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये काही दिवसांपूर्वी त्याने एका महिलेला अॅड केले.  त्यानंतर ग्रुपवरचे मॅसेज पाहिल्यानंतर त्या महिलेच्या लक्षात आले. तिने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी लगेच मुश्ताकला सायनहून अटक केली. मुश्ताकची चौकशी केली असता तो महिलेला जाणत नाही हे त्याने स्पष्ट केलं. तसंच हा नंबर त्याच्या नातेवाईकाचा आहे असा गैरसमज झाल्यामुळे त्याने हा नंबर ग्रुपमध्ये अॅड केला होता अशी माहिती त्याने चौकशीत दिली. 

Web Title: Adhin was arrested by adding a woman to the porn Whitswap group