Actress Deepali threatens Accused arrested by Oshiwara police | अहमदनगरला ये, हाथरसची पुनरावृत्ती करतो! अभिनेत्री दीपाली सय्यदला धमकी; ओशिवरा पोलिसांकडून आरोपीस अटक

अहमदनगरला ये, हाथरसची पुनरावृत्ती करतो! अभिनेत्री दीपाली सय्यदला धमकी; ओशिवरा पोलिसांकडून आरोपीस अटक


मुंबई : ‘अहमदनगरला ये, तुझ्यासोबतही हाथरसची पुनरावृत्ती करतो’, अशी धमकी मराठी अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद हिला फोनवरुन देण्यात आली होती. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी सोमवारी संदीप वाघ याला अहमदनगरमधून अटक केली.

दीपालीला ४ ऑक्टोबर, २०२० रोजी एका वाढदिवसाची पार्टी अटेंड करण्यास सांगण्यात आले होते. तिने १ लाख रुपये मानधन असल्याचे सांगितले. तेव्हा १ लाखात तू काय काय करणार? अशी विचारणा करत नंतर फोनवरुन अश्लील संभाषण करण्यात आले. दीपालीने जाब विचारताच त्याने अर्वाच्च भाषेत वाद घातला. अहमदनगरला ये, भरचौकात तुझ्यासोबत हाथरसमध्ये १८ वर्षीय मुलीसोबत घडला तोच प्रकार घडेल, अशी धमकी दिल्याचे तिने पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

५ ऑक्टोबर रोजी रात्री ओशिवरा पोलीस ठाण्यात तिने ही तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी गुन्हा दाखल करुन घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव यांनी तपासाअंती आरोपीला अहमदनगरमधून अटक केली.
 

Web Title: Actress Deepali threatens Accused arrested by Oshiwara police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.