सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणाऱ्यांविरोधात अभिनेत्याने केली तक्रार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 18:03 IST2019-06-14T18:01:12+5:302019-06-14T18:03:06+5:30

याप्रकरणी साहिलने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

The actor has registered complain against three people who viral objectionable post on social media | सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणाऱ्यांविरोधात अभिनेत्याने केली तक्रार  

सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणाऱ्यांविरोधात अभिनेत्याने केली तक्रार  

ठळक मुद्देअश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या दोन महिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या महिलांनी अभिनेत्याचे फोटो मॉर्फ करून आक्षेपार्ह पोस्टसोबत शेअर केले होते.

मुंबई - अभिनेता साहिल खान याचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या दोन महिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या महिलांनी अभिनेत्याचे फोटो मॉर्फ करून आक्षेपार्ह पोस्टसोबत शेअर केले होते. याप्रकरणी साहिलने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी दोन महिला आणि त्यांना मदत करणाऱ्या एका पुरुषाविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल याअगोदर अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफसोबत प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आला होता. नंतर साहिलने व्यवसायात आपली फसवणूक केल्याचा आरोप आयेशाने केला होता.

साहिल खान हा सध्या फिटनेस इंडस्ट्री आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करत आहे. त्याच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणारे तिघेही याच इंडस्ट्रित काम करणारे आहेत. त्या तिघांनीही स्वत:च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर साहीलचे अश्लील फोटो आणि तो पैसे घेऊन सेक्स करतो अशा प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. य़ा प्रकरणी दोन महिलांवर आणि एका पुरुषाविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The actor has registered complain against three people who viral objectionable post on social media