सोशल मीडियातून ओळख, नंतर प्रेम; वादातून प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 11:30 IST2023-05-05T11:27:34+5:302023-05-05T11:30:05+5:30

बैतुलच्या मुलताई पोलीस ठाणे परिक्षेत्रातील गांधी वार्ड परिसरात बुधवारी रात्री एका तरुणीची चाकूने गळा चिरुन हत्या करण्यात आली.

Acquaintance through social media, then love; The boy killed the girl in madhya pradesh | सोशल मीडियातून ओळख, नंतर प्रेम; वादातून प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या

सोशल मीडियातून ओळख, नंतर प्रेम; वादातून प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या

मध्य प्रदेशच्या बैतुल शहरात एका तरुणीची भररस्त्यात हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केली असून पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, त्यातूनच हा वाद झाला आणि घटना खून करण्यापर्यंत पोहोचली, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आलं आहे. प्रेयसी संबंधित युवकाचा व्हिडिओ बनवून त्याला ब्लॅकमेल करत होती, पैशांची मागणी करत होती. त्याच रागातून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. 

बैतुलच्या मुलताई पोलीस ठाणे परिक्षेत्रातील गांधी वार्ड परिसरात बुधवारी रात्री एका तरुणीची चाकूने गळा चिरुन हत्या करण्यात आली. सिमरन खान असं मुलीचं नाव असून ती २६ वर्षांची आहे. तर, २५ वर्षीय सानिफ मलिक या युवकासोबत तिचे प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधातील वादातून सानिफनेच तरुणीची हत्या केली आहे. 

याप्रकरणी, पोलीस अधीक्षक सिद्धार्थ चौधरी यांनी म्हटले की, मृत तरुणी आरोपी युवकावर दबाव टाकून त्याला त्रास देत होती. एक वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती. या मुलीचे अनेक मुलांसोबत संबंध होते. तर, आरोपी युवकाला व्हिडिओ आणि फोटो दाखवत मुलीकडून ब्लॅकमेल करण्यात येत होतं. त्या माध्यमातून युवतीने युवकाकडून पैसेही उकळले होते. मात्र, तिची आर्थिक भूक भागत नसल्याने ती सातत्याने पैशांची मागणी करत. त्यादिवशीही मुलगी मुलाच्या दुकानावर पोहोचली होती. दुकानासमोर तिने गोंधळही घातला. याचवेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि युवकाने अंड्याच्या दुकानातील चाकुने वार करत मुलीची हत्या केली. 

Web Title: Acquaintance through social media, then love; The boy killed the girl in madhya pradesh