तरुणीशी फोनवर अश्लील भाषेतून बोलणाऱ्या भामट्याला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 23:43 IST2018-12-12T23:42:36+5:302018-12-12T23:43:46+5:30

अशोक मंडल असे या आरोपीचे नाव आहे. जानेवारीपासून तो तिला फोन करून त्रास देत असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

The accused, who speaks sexist speech on the phone, | तरुणीशी फोनवर अश्लील भाषेतून बोलणाऱ्या भामट्याला बेड्या

तरुणीशी फोनवर अश्लील भाषेतून बोलणाऱ्या भामट्याला बेड्या

मुंबई - वडाळा परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला फोन करून अश्लील भाषेत बोलून त्रास देणाऱ्या भामट्याला पोलिसांनीअटक केली. अशोक मंडल असे या आरोपीचे नाव आहे. जानेवारीपासून तो तिला फोन करून त्रास देत असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

मूळचा पश्चिम बंगाल येथील राहणारा मंडल हा दिवा परिसरात राहतो. छोटी मोठी काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. जानेवारी महिन्यात त्याचा फोन प्रथम तरुणीला आला होता. त्यावेळी त्याने तरुणीसोबत अश्लील भाषेत बोलू लागला. तरुणीने फोन कट करत त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, मंडलचं वारंवार फोन करून त्रास देणं सुरूच होतं. रोजच्या या त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने शेवटी वडाळा पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरूवात केली. तपासादरम्यान आरोपी मंडलने आठ वेगवेगळेया फोन नंबरवरून तरूणीला फोन केल्याचे निदर्शनास आले. त्याच्या फोन लोकेशनवरूनच त्याची माहिती मिळवत पोलिसांनी त्याला दिवा येथून अटक केली.

Web Title: The accused, who speaks sexist speech on the phone,