शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

घरफोड्या करणारे पुण्यातील अट्टल चोरटे पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 9:44 PM

Crime News : खोपोली पोलीस ठाणे हद्दीत गेल्या महिन्यात 16 सप्टेंबर रोजी घरफोडी, चोरी झाली होती.

निखिल म्हात्रेअलिबाग -रायगड जिल्ह्यातील खोपोली, रसायनी, नेरळ परिसरात घरफोड्या, चोर्‍या करुन धुमाकूळ घालणार्‍या पुणे-रामटेकडी येथील दोन चोरट्यांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून घरफोडी, चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आले असून, 11 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या घरफोड्यांमधील अन्य दोन अट्टल चोरट्यांना शिकापूर पोलिसांनी अटक केली असून, ते पोलीस कोठडीत आहेत.   पोलीस अधीक्षक कार्यालयात आज (13 ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी या कारवाईची माहिती दिली. इरफान रसुल शेख (वय-30, रा. सर्व्हे नं.109, 110, नवीन म्हाडा कॉलनी, रामटेकडी, हडपसर, पुणे) व ऐलानसिंग श्यामसिंग कल्याणी (वय-31, रा.सर्व्हे नं.110, कोठारी मोटार्सच्या जवळ, रामटेकडी, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले रवीसिंग शामसिंग कल्याणी (रा.रामटेकडी, हडपसर, पुणे) व लखनसिंग रजपुतसिंग दुधाणी (रा.रामटेकडी, हडपसर, पुणे) हे दोघे शिकापूर पोलिसांच्या ताब्यात असून, शिकापूर पोलीस ठाणे येथील गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहेत.                                                

खोपोली पोलीस ठाणे हद्दीत गेल्या महिन्यात 16 सप्टेंबर रोजी घरफोडी, चोरी झाली होती. घरफोडी, चोरीच्या घटनांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याने, हे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी आदेश केले होते. पोलीस अधीक्षक दुधे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांचे पथक तयार करण्यात आले होते.   या पथकाने घरफोडी झालेल्या ठिकाणच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचा मागोवा घेत गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलच्या मालकाचा शोध घेण्यात आला. गुप्त बातमीदार व वानवडी पोलीस ठाणे, पुणे शहर यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजमधील चोरी करणारे संशयित निष्पन्न केले. त्यानंतर मोटारसायकल मालक इरफान रसुल शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे मोटारसायकलबाबत विचारणा केली असता सदरची मोटारसायकल ही ऐलानसिंग शामसिंग कल्याणी व रवीसिंग शामसिंग कल्याणी यांना दिल्याची कबुली त्याने दिली. त्यावरुन ऐलानसिंगला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचा भाऊ रखीसिंग शामसिंग कल्याणी व मित्र लखनसिंग रजपुतसिंग दुधाणी यांनी रायगड येथे घरफोडी, चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी दिले असल्याचीही कबुली दिली.                                                                                                                                                                      

पोलिसांनी या प्रकरणात इरफान रसुल शेख याच्याकडून चोरीसाठी वापरलेली 35 हजार रुपये किंमतीची होन्डा कंपनीची अ‍ॅक्टीवा मोटारसायकल जप्त करत, ऐलानसिंग शामसिंग कल्याणी याच्याकडून खोपोली पोलीस ठाणे, नेरळ पोलीस ठाणे, रसायनी पोलीस ठाणे इत्यादी ठिकाणच्या चोरीच्या गुन्ह्यातील 10 लाख 73 हजार 350 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे.   आतापर्यंत त्यांच्याकडून खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील 3, रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील 2, नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील 5 असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. या घरफोड्यांमध्ये 11 लाख 23 हजार 100 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. यापैकी 11 लाख 8 हजार 350 रुपये किमतीचा 95 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले आहे.   दरम्यान, हे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक फौजदार गिरी, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, राजेश पाटील, प्रतीक सावंत, जितेंद्र चव्हाण, शामराव कराडे, चालक पोलीस हवालदार देवराम कोरम, पोलीस नाईक राकेश म्हात्रे, पोलीस शिपाई अक्षय जगताप, महिला पोलीस हवालदार संजीवनी म्हात्रे, महिला पोलीस शिपाई जयश्री पळसकर, मोनिका मोरे, तसेच सायबर सेल शाखेचे पोलीस नाईक अक्षय पाटील, तुषार घरत, सिध्देश शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.                                                                                                                                                                                                                                                                

या दोघांवर दाखल आहेत घरफोडी, चोरीचे 33 गुन्हे! रायगडातील घरफोड्यांमध्ये सहभाग असलेले आणि शिकापूर पोलिसांच्या ताब्यात असलेले रवीसिंग कल्याणी व लखनसिंग दुधाणी हे अट्टल चोरटे आहेत. यापैकी रवीसिंग कल्याणी याच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीत घरफोडी, चोरीचे 11 गुन्हे दाखल असून, लखनसिंग दुधाणी विरोधात पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीत 22 गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीPoliceपोलिसPuneपुणेalibaugअलिबाग