शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध फोटोग्राफरची बॅग पळवणारे चोरटे कैद, तीन तासात लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 13:47 IST

महत्वाचं म्हणजे पोलिसांनी अवघ्या तीन तासात कॅमेराची बॅग शोधून दिली आहे. 

ठळक मुद्देजलील शेख, मोहम्मद फरहान अली शेख, अरबाज अकबर घनसे अशी या आरोपींची नावे आहे. दरम्यान या प्रकरणी नियाज यांनी शिवडी पोलिसात तीन दिवसांनी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली. 

मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपणाऱ्या छायाचित्रकाराचा कॅमेरा चोरणाऱ्या तिघांना शिवडी पोलिसांनीअटक केली आहे. जलील शेख, मोहम्मद फरहान अली शेख, अरबाज अकबर घनसे अशी या आरोपींची नावे आहे. न्यायालयाने या तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. महत्वाचं म्हणजे पोलिसांनी अवघ्या तीन तासात कॅमेराची बॅग शोधून दिली आहे. मुंबईत राहणारे नियाज बकरीदी मन्सूरी हे प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक राजकिय पुढाऱ्यांसाठी ते काम करतात. १५ ऑगस्टनिमित्त शिवडीच्या बीपीसीएल परिसरात स्वातंत्र  दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नियाज हे फोटो काढण्यासाठी आले होते.फोटो काढत असताना, अचानक आलेल्या पावसामुळे त्या कार्यक्रमावेळी एकच पळापळ झाली. त्यावेळी नियाज हे देखील पावसात कॅमेरा भिजू नये म्हणून त्याच्या गाडीत येऊन बसले. मात्र, त्याच दरम्यान ते त्यांची बॅग कार्यक्रमाच्या ठिकाणी विसरले. त्याच्या बॅगेत निकॉनचा किंमती कॅमेऱ्यांच्या लेन्स होत्या. पाऊस गेल्यानंतर नियाज पुन्हा कार्यक्रम असलेल्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांना त्यांची बॅग मिळून आली नाही. सर्वत्र शोधले असता बॅग चोरीला गेले असल्याचा त्यांना संशय आला. मात्र, तातडीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जायचे असल्याने त्यांनी पोलिसात तक्रार न करता. त्या कार्यक्रमाच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी नियाज यांनी शिवडी पोलिसात तीन दिवसांनी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोर्ट झोनच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक किरण मांडरे यांनी तपासाला सुरूवात केली.परिसरातील शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यांना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन आरोपी अस्पष्ट त्या कार्यक्रमाजवळ दिसून आले. हे तिघे काही तरी संशयास्पद वस्तू नेत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळा पोलीस उपनिरीक्षक मांडरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीत यातील एक आरोपी रे रोड परिसरात रहात असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून पोलीस इतर दोन आरोपींपर्यंत पोहचले. या तिघांपैकी एका आरोपीच्या घरातून पोलिसांनी नियाज याची चोरलेली कॅमेऱ्याची बॅग तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या तीन तासात हस्तगत करण्यात आली आहे. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसArrestअटक