मंचर : आंबेगाव तालुक्यातील पुणे-नाशिक रस्त्यावरील पेठ येथे भरधाव वेगातील इनोव्हा कारने दोन दुचाकींना उडवले. या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी( दि.२) सायंकाळी ४ वाजता घडली. जखमींवर मंचर येथील रिद्धी सिद्धी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ बायपास नजीक असणाऱ्या रानवारा पेट्रोलपंपावरुन (एमएच. १४ बी.एल. ६०६७ )या दुचाकीवरुन विशाल कराठे (वय १८) आणि त्याच्या पाठीमागे बसलेला अरुण धुमाळ (वय ४८ ) हे पेठ गावाकडे जात होते. त्यावेळी पुण्याकडे जाणाऱ्या (एमएच.३९ व्ही. ५०५५) या इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिली. अपघात करुन इनोव्हा कारचालक इनोव्हा घेवून पुढे १०० मीटर इनोव्हा गाडीसह पळून गेला. पुढे पेठ गावाच्या बायपास वरुन युटर्न करुन इनोव्हा कार चालक भांबावलेल्या अवस्थेत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने मंचरच्या दिशेने माघारी येत असताना पुन्हा दुसऱ्या ( एमएच. १४ ए.ए. २५४७ ) दुचाकीला धडक दिली. त्यात प्रफुल्ल उत्तम शिंदे (वय २६ रा.पेठ ) जागीच ठार झाला. अपघातातील जखमींवर मंचर येथील रिद्धी सिद्धी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. या अपघातातील इनोव्हाचा चालक पळून गेला आहे. मंचर पोलीस इनोव्हा कारचालकाचा शोध घेत असून अज्ञात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव इनोव्हाने दुचाकींना उडवले, एक ठार व दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 20:02 IST
आंबेगाव तालुक्यातील पुणे-नाशिक रस्त्यावरील पेठ येथे भरधाव वेगातील इनोव्हा कारने दोन मोटारसायकलला उडवले.
पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव इनोव्हाने दुचाकींना उडवले, एक ठार व दोघे जखमी
ठळक मुद्देअज्ञात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल