गुजरनगर येथे चालकाला डुलकी लागल्याने अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 16:00 IST2019-04-24T16:00:46+5:302019-04-24T16:00:51+5:30
एका वाहन चालकाला गाडी चालविताना अचानक डुलकी लागली, त्यामुळे गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी बीआरटीच्या बॅरीगेटला घासून अपघात झाला.

गुजरनगर येथे चालकाला डुलकी लागल्याने अपघात
थेरगाव : गुजर नगर येथील सबवे उड्डाण पुलावर मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास एका वाहन चालकाला गाडी चालविताना अचानक डुलकी लागली, त्यामुळे गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी बीआरटीच्या बॅरीगेटला घासून अपघात झाला. या अपघातात कोणतीही हानी झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले.
वाहनचालकांचा ताबा सुटल्याने अचानक गाडी उजव्या बाजूला ओढली गेली व जवळपास २० मीटर लांब गाडी बीआरटीच्या कठड्याला घासत गेली. त्यामुळे गाडीचा उजव्या बाजूचा टायर फुटला व गाडी घासल्याने हजारो रुपयांचे गाडीचे नुकसान झाले. तसेच बीआरटीचे कठडे तुटले. टायर फुटण्याचा आवाज एवढा मोठा होता कि त्याचा आवाज अर्धा किलोमीटर वर पोहचला होता. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांनी उड्डाणपुलाकडे धाव घेतली.
वाहनचालकाकडून जर गाडी डाव्या बाजूला ओढली गेली असती तर गाडी उड्डाणपुलावरून खाली कोसळण्याची शक्यता होती. त्यात मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वेळी परिसरातील तरुणांनी काही काळ वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी सहकार्य दाखवले .