अल्पवयीन असताना अत्याचार, सज्ञात झाल्यानंतर तक्रार; महाबळेश्वरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:10 PM2021-10-19T21:10:54+5:302021-10-21T18:54:07+5:30

कृत्याला मदत करणाऱ्या दोन महिलांवरही गुन्हा

Abuse when a minor, complaint after becoming aware; Incident in Mahabaleshwar | अल्पवयीन असताना अत्याचार, सज्ञात झाल्यानंतर तक्रार; महाबळेश्वरमधील घटना

अल्पवयीन असताना अत्याचार, सज्ञात झाल्यानंतर तक्रार; महाबळेश्वरमधील घटना

Next

सातारा : एका व्यक्तीने मुलगी अल्पवयीन असताना तिच्यावर वारंवार अत्याचार केले. यातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर संबंधिताने तिचा गर्भपातही केला. हा प्रकार सुमारे नऊ वर्षांपूर्वी घडला असून, संबंधित पीडित मुलीने सज्ञान झाल्यानंतर या प्रकाराची वाच्यता केली. यावरून पोलिसांनी आरोपीला सहकार्य करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गोरंग कालीपोदी पाल असे मुख्य संशयित आरोपीचे नाव असून, त्याला सहकार्य करणाऱ्या आरती पाल (रा. खराडी पुणे),  इंदुबाइ सपकाळ (रा. महाबळेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असताना संशयित गोरंग पाल याने विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. तसेच वेळोवेळी पीडितेचा गर्भपातही केला. या कृत्यासाठी दोन्ही महिलांनी त्याला सहकार्य केले असल्याचे पुढे आले. अखेर हा प्रकार सहन न झाल्याने संबंधित पीडित मुलीने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तत्काळ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करून आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना केले आहे.

Web Title: Abuse when a minor, complaint after becoming aware; Incident in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app