अल्पवयीन मुलासोबत महिलेचं घृणास्पद कृत्य; सेक्स व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर केला अपलोड अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 12:56 IST2023-02-26T12:52:12+5:302023-02-26T12:56:02+5:30

नॅशनल सायबर क्राईम पोर्टल टिपलाईनच्या वृत्तानुसार, संबंधित महिला चाइल्ड पोर्नोग्राफीची आरोपी असल्याचे आढळून आले आहे.

Abominable act of woman with minor child; Made a sex video and uploaded it on Instagram | अल्पवयीन मुलासोबत महिलेचं घृणास्पद कृत्य; सेक्स व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर केला अपलोड अन्...

अल्पवयीन मुलासोबत महिलेचं घृणास्पद कृत्य; सेक्स व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर केला अपलोड अन्...

हल्दवानी येथून एक धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेवर चाइल्ड पोर्नोग्राफीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने अल्पवयीन मुलासोबत पोर्न व्हिडियो तयार करून तो इंस्टाग्रामवर अपलोड केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात एसटीएफ यांच्या सूचनेवरून  करण्यात आलेल्या कारवाईनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 
यासंदर्भात बोलताना कोतवाल हरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, एसटीएफकडून मिळालेल्या सूचनेनुसार, मार्च 2022 मध्ये इंस्टाग्रामवर एक अश्लील व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. संबंधित महिलेने अल्पवयीन मुलासोबत 47 सेकंदांचा पोर्न व्हिडिओ तयार केला होता. 

हा व्हिडिओ उत्तराखंडमध्ये तयार करून अपलोड करण्यात आल्याचे नॅशनल सायबर क्राइम पोर्टलच्या तपासात समोर आले आहे. तसेच, एसएसपी एसटीएफ देहरादूनने केलेल्या तपासात हा संपूर्ण प्रकार हल्द्वानीतील एका भागात घडले असल्याचेही समोर आले आहे.

नॅशनल सायबर क्राईम पोर्टल टिपलाईनच्या वृत्तानुसार, संबंधित महिला चाइल्ड पोर्नोग्राफीची आरोपी असल्याचे आढळून आले आहे. आरोपी महिलेविरुद्ध आदेशावरून आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे नौनितालचे एसएसपी पंकज भट्ट यांनी म्हटले आहे. 
 
 

Web Title: Abominable act of woman with minor child; Made a sex video and uploaded it on Instagram