आपच्या नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, लकी ओबेरॉय गुरुद्वारातून बाहेर पडताच अंदाधूंद गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:45 IST2026-02-06T12:43:27+5:302026-02-06T12:45:10+5:30
Lucky Oberoi: पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. गुरुद्वारातून बाहेर पडल्यानंतर लकी ओबेरॉय यांच्यावर हल्ला करण्यात आला.

आपच्या नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, लकी ओबेरॉय गुरुद्वारातून बाहेर पडताच अंदाधूंद गोळीबार
Luck Oberoi Shot Dead: आम आदमी पार्टीचे नेते लकी ओबेरॉय यांची शुक्रवारी (६ फेब्रुवारी) सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जालंधर येथील गुरुद्वाराबाहेर ही घटना घडली. ओबेरॉय हे गुरुद्वारातून बाहेर पडून कारमध्ये बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ८ ते १० राऊंड फायर केले. यात पाच गोळ्या लागून लकी ओबेरॉय हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले की, ज्यावेळी हल्लेखोरांनी गोळीबार केला, त्यावेळी लकी ओबेरॉय हे कारमध्ये बसले होते. जालंधरमधील लोकांची गर्दी असलेल्या मॉडेल टाऊन भागातील गुरुद्वारा साहिब येथे ही घटना घडली.
VIDEO | Punjab: Aam Aadmi Party (AAP) leader Lucky Oberoi was shot dead outside a Gurdwara in Model Town, Jalandhar; probe underway. Visuals from the spot.
— Press Trust of India (@PTI_News) February 6, 2026
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7)#Punjab#Jalandharpic.twitter.com/laqDgjTU90
दोन हल्लेखोरांनी केला अंदाधूंद गोळीबार
लकी ओबेरॉय यांनी गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये गाडी उभी केली होती. गुरुद्वारातून बाहेर पडल्यानंतर कारमध्ये बसले होते. त्याचवेळी तिथे दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले आणि त्यांनी ८ ते १० राऊंड फायर केले. यात पाच गोळ्या ओबेरॉय यांना लागल्या आणि ते जखमी झाले. गोळीबारात आजूबाजूच्या गाड्यांचेही नुकसान झाले.
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. तर, गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकून लोकही घाबरले. लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तातडीने लकी ओबेरॉय यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
#WATCH | Punjab | One Lucky Oberoi shot at by armed assailants near a gurudwara in Jalandhar this morning, confirms Police. pic.twitter.com/I5p63bTo7I
— ANI (@ANI) February 6, 2026
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची आणि परिसराची पाहणी केली. पोलीस परिसरात असलेले सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेतला जाणार आहे.
लकी ओबेरॉय हे राजकारणात सक्रीय होते. त्यांच्या पत्नीने महापालिकेची निवडणूकही लढवली होती. पण, त्यांची हत्येमागे राजकीय अंग आहे की, आणखी दुसऱ्या कारणामुळे त्यांना मारण्यात आले. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.