बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:41 IST2025-09-16T15:40:21+5:302025-09-16T15:41:26+5:30
Gangrape case: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या एका समुद्रकिनारी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली होती. त्याचवेळी दोघांनी त्यांना गाठलं आणि तिच्यावर अत्याचार केला.

बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत बीचवर फिरायला गेली होती. त्यावेळी तिथे बाजूला बसलेल्या आरोपींनी त्यांचा व्हिडीओ शूट करायला सुरूवात केली. त्यावरून तरुणीचा बॉयफ्रेंड आणि आरोपींमध्ये वाद झाला. त्यानंतर त्यांनी बॉयफ्रेंडला मारायला सुरूवात केली. ते इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी बॉयफ्रेंडसमोरच तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला.
ही घटना ओडिशातील पुरी जिल्ह्यात घडली आहे. ब्रह्मगिरी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या बलिहारी चंडी बीचवर तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड शनिवारी फिरायला गेले होते. त्यावेळी दोन आरोपींनी त्यांच्यावर नजर ठेवली आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
बीचवर तरुणी आणि तरुणासोबत काय घडले?
पोलिसांनी सांगितले की, तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत शनिवारी बलिहारीचंडी बीचवर फिरायला गेली होती. त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूने आरोपी तिथे बसले होते. त्यांनी आधी जोडप्याचा व्हिडीओ शूट केला.
आरोपी व्हिडीओ बनवत असल्याचे तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या लक्षात आलं. त्यांनी त्यावरून आरोपींनाा हटकलं. त्यांनी त्यांच्यात वाद सुरू झाला. आरोपींनी तरुणीच्या बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.
पोलिसांना आरोपी कसे सापडले?
शनिवारी घटना घडली, पण तरुणीने तक्रार दिली नव्हती. आपली बदनामी होईल या भीतीपोटी तिने सुरूवातीला तक्रार देणं टाळलं. मात्र, अशी घटना घडल्याचे पोलिसांना कळले. त्यांनी तरुणीचा शोध घेतला आणि तिला समजावले. त्यानंतर सोमवारी या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तरुणीकडून आरोपींबद्दलची सगळी माहिती घेतली. तरुणीने वर्णन केल्याप्रमाणे आरोपींची रेखाचित्रे तयार करण्यात आली. ब्रह्मगिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला आणि आरोपींना पकडले. आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले. त्यातून त्यांनी व्हिडीओ डिलीट केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन आरोपींना अटक करण्यात आले असून, एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.