व्यापाऱ्याला नदीकिनारी नेऊन मारहाण, सकाळी १० वाजताच लुटले ९ तोळे सोने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 23:06 IST2022-11-06T23:06:20+5:302022-11-06T23:06:57+5:30

उत्तम दगडोबा गडम हे माजलगावातील कपडा व्यापारी आहेत. ते रविवारी नेहमीप्रमाणे  हनुमान चौकातील मारोती मंदिरात दर्शनासाठी गेले होते

A merchant was taken to the river bank and beaten, 9 tolas of gold was robbed at 10 am in majalgaon | व्यापाऱ्याला नदीकिनारी नेऊन मारहाण, सकाळी १० वाजताच लुटले ९ तोळे सोने

व्यापाऱ्याला नदीकिनारी नेऊन मारहाण, सकाळी १० वाजताच लुटले ९ तोळे सोने

माजलगाव - येथील प्रसिध्द व्यापारी उत्तम दगडोबा गडम यांना भुलथापा मारून शहराच्या मध्यवस्तीतून गाडीवर बसवत नदीकिनारी नेऊन मारहाण करीत त्यांच्या अंगावरील ९ तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना माजलगाव शहरात रविवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.

उत्तम दगडोबा गडम हे माजलगावातील कपडा व्यापारी आहेत. ते रविवारी नेहमीप्रमाणे  हनुमान चौकातील मारोती मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर येताच त्यांना दोघा दुचाकीस्वारांनी जवळ बोलावले. आम्हाला मंगलनाथ मंदिराला देणगी द्यायची आहे, ती कुणाकडे द्यावी लागेल, आम्हाला मदत करा, असे म्हणत त्यांच्याकडे विचारपूस केली. शिवाय त्यांना गाडीवर बसण्याची विनंती केली. त्यांच्यासोबत गाडीवर बसून मंगलनाथ मंदिराचा रस्ता पकडला. मंदिराच्या जवळ आल्यानंतर या लुटारूंनी दुचाकी मंगलनाथ मंदिराकडे न नेता ती कदम यांच्या मंदिराकडे नेली तेथे आधीपासूनच दोघेजण बसलेले होते, त्यांनी गडम यांना खाली उतरवून मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट असे ९ तोळे दागिने काढून घेतले. घटनेनंतर गडम यांनी माजलगाव शहर ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
 

Web Title: A merchant was taken to the river bank and beaten, 9 tolas of gold was robbed at 10 am in majalgaon