चालत्या कारमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 07:00 IST2023-05-19T06:58:19+5:302023-05-19T07:00:02+5:30
"राष्ट्रीय महामार्ग ३१सीवर चार तरुणांनी मुलीला जबरदस्तीने कारमध्ये नेत चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली"

चालत्या कारमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
कोक्राझार : आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीवर चार तरुणांनी चालत्या कारमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग ३१सीवर चार तरुणांनी मुलीला जबरदस्तीने कारमध्ये नेत चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, हा भाग डोटमा शहराजवळ आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू करून बुधवारी सायंकाळी चार आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना कोक्राझार येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.