शहरं
Join us  
Trending Stories
1
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
2
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
3
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
4
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती भडकणार?
5
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
6
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
7
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
8
कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
9
मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
10
टिंडरवर मैत्री, भेटायला बोलावलं; जेवताना ती म्हणाली बाथरूममध्ये जा, बाहेर येताच तरुणाचा खेळ खल्लास!
11
हे भगवान! ५०१ रुपयांचं 'यंत्र' विकत घेतलं, १० वर्षं देवघरात पूजा केली; Reel पाहून उघडलं तेव्हा धक्काच बसला!
12
Diesel Price Hike: युद्धाचा परिणाम, 'या' डिझेलच्या दरात २८ रुपयांची वाढ; पाहा कोणावर पडणार आर्थिक भार
13
मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड
14
अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय
15
बारामती बिनविरोध नाही? काँग्रेस उमेदवार देणार, पक्षश्रेष्ठींचा होकार; लवकरच जाहीर करणार!
16
फलंदाजीत कमाल, पण बोलंदाजी नडली, आक्षेपार्ह शेरेबाजीमुळे अभिषेक शर्मावर BCCI ने केली कठोर कारवाई 
17
कोण आहेत १६७ कोटींची पेटिंग खरेदी करणारे सायरस पूनावाला? 'वॅक्सिन किंग'च्या नावानं आहेत प्रसिद्ध, नेटवर्थ किती?
18
पाकिस्तानात तेलाचा भडका! पेट्रोल 458, डिझेल 520 रुपयांवर, जनतेला वाऱ्यावर सोडून US ला करतोय पुरवठा? होतेय भारताशी तुलना
19
नमिता थापर यांच्या 'एमक्योर'चा मास्टरस्ट्रोक! वजन कमी करण्याचे इंजेक्शन ५५% स्वस्त, नवीन किंमत आवाक्यात
20
नराधमपणाचा कळस! मुलाचा आजार बरा करण्यासाठी पोटच्या मुलीचा बळी; आईनेच आवळला गळा
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या पत्नीवर जीव जडला; प्रेमात अडसर ठरणाऱ्या मित्राला गळा आवळून मारला अन्... 'असा' झाला उलगडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:08 IST

आपल्या मित्राच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांआड येणाऱ्या २६ वर्षीय जीवनलाल यादवची त्याच्याच मित्राने निर्घृण हत्या केली.

मैत्री या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये उघडकीस आली आहे. आपल्या मित्राच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांआड येणाऱ्या २६ वर्षीय जीवनलाल यादवची त्याच्याच मित्राने निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दतिया-शिवपुरी सीमेवरील जंगलात दफन केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे नेमका प्रकार? 

मृत जीवनलाल यादव (२६) हा राजगड जिल्ह्यातील खिलचीपूरचा रहिवासी होता. त्याचा मित्र छोटू ठाकूर याचे जीवनलालच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या दोघांनाही भविष्यात एकत्र राहायचे होते, पण त्यांच्या मार्गात जीवनलाल हा मोठा अडथळा ठरत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी छोटूने आपल्या एका साथीदारासह जीवनलालच्या हत्येचा कट रचला.

फिरायला नेण्याच्या बहाण्याने केला गेम 

८ जानेवारी रोजी छोटूने जीवनलालला फिरण्याच्या बहाण्याने आपल्या गावी शिवपुरीला बोलावून घेतले. आपल्या मित्रावर विश्वास ठेवून जीवनलाल बाईकवरून राजगडहून शिवपुरीला पोहोचला. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही आणि त्याचा फोनही बंद झाला. घाबरलेल्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि जीवनलालच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा संशयाची सुई अजय जाटव आणि छोटू ठाकूरकडे वळली.

अशी उघड झाली मर्डर मिस्ट्री 

पोलिसांनी अजय जाटव याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने सर्व सत्य ओकून टाकले. त्याने सांगितले की, छोटू आणि त्याने मिळून जीवनलालचा गळा आवळून खून केला. त्यानंतर खाती बाबा मंदिर परिसरातील निर्जन डोंगराळ भागात वनविभागाने खोदलेल्या एका खड्ड्यात त्याचा मृतदेह गाडून टाकला. अजयच्या माहितीवरून पोलिसांनी जंगलात शोधमोहीम राबवून जीवनलालचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला.

पत्नीच्या भूमिकेचीही चौकशी सुरू 

पोलिसांनी छोटू ठाकूर आणि अजय जाटव या दोघांनाही अटक केली असून, जीवनलालची बाईकही जप्त केली आहे. या क्रूर कटात मृत जीवनलालच्या पत्नीचाही सहभाग होता का? या दिशेने आता पोलीस कसून चौकशी करत आहेत. "हा केवळ खूनाचा गुन्हा नसून विश्वासघाताचा कळस आहे, आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल," असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Affair led to murder: Friend kills for love, buries body.

Web Summary : In Madhya Pradesh, a man murdered his friend for having an affair with the man's wife. The body was buried in a forest, but police investigations led to the arrest of two suspects. The victim's wife is also under investigation.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू