प्रेयसीची थेट धमकी, तुझ्या पतीला माझ्याकडे पाठवून दे, नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 07:09 IST2023-07-17T07:08:12+5:302023-07-17T07:09:04+5:30

प्रेयसीने धमकी दिल्याने प्रकरण पोलिसांत

A direct threat from a girlfriend, send your husband to me, or else… | प्रेयसीची थेट धमकी, तुझ्या पतीला माझ्याकडे पाठवून दे, नाही तर...

प्रेयसीची थेट धमकी, तुझ्या पतीला माझ्याकडे पाठवून दे, नाही तर...

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लग्नापूर्वी पतीचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध होते, तिने घरी येऊन तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी महिलेला दिल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. पतीच्या बचावासाठी या पत्नीने महिलेविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित तरुणाचे लग्नापूर्वी एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे सदर महिला या तरुणाच्या पत्नीला वारंवार फोन करून शिवीगाळ करीत असे. क्रमांक ब्लॉक केला. तरीदेखील ती महिला दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत असल्याचे या तरुणाच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले. १४ जुलैला सदर महिला या तरुणाच्या घरी पोहचली व तुझा पती कोठे आहे, असे विचारले. त्याला माझ्याकडे पाठव नाही तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीत त्याची नोकरीही खाऊन टाकेन, तुमची बदनामी करेन, अशी धमकी दिली. मला पाच लाख रुपये द्या असे म्हणत महिलेने तरुणाच्या पत्नीला मारहाण केली.

Web Title: A direct threat from a girlfriend, send your husband to me, or else…