कालिचरण महाराजाविरोधात नगरमध्ये गुन्हा दाखल
By अण्णा नवथर | Updated: May 10, 2023 15:04 IST2023-05-10T15:04:28+5:302023-05-10T15:04:43+5:30
याबाबत पाेलिस हवालदार अजय गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. दि. १४ डिसेेंबर २०२२ रोजी नगर शहरातून जनक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

कालिचरण महाराजाविरोधात नगरमध्ये गुन्हा दाखल
अण्णा नवथर
अहमदनगर: शहरातील दिल्लीगेट येथे झालेल्या सभेत अक्षेपहार्य वक्तव्य केल्याप्रकरणी कालिचरण महाराज उफ अभिजित धनंजय सराग ( रा. अकोला) यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिस हवालदार अजय गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. दि. १४ डिसेेंबर २०२२ रोजी नगर शहरातून जनक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा माळीवाडा, चितळेरोड मार्गे दिल्लीगेट येथे पोहोचला. तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी कालिचरण महाराज यांनी मार्गदर्शन करताना अक्षेपहार्य विधान केले होते. याबाबत पोलिसांनी सरकारी अभियोक्ता यांच्याकडून मार्गदर्शन मागविले होते. हे मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर भादवि कलम १५३ (अ) व ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.