एका एजेंटनं मला किडनी विकण्यासाठी तयार केले. ६ लाखांमध्ये सौदा झाला. आधी रक्कम मग ऑपरेशन करण्याचं ठरले. परंतु सर्जरीनंतर खात्यात केवळ साडे तीन लाख आले. बाकी पैसे मिळालेच नाही असा धक्कादायक प्रकार आयुष नावाच्या युवकासोबत घडला आहे. कानपूरमध्ये किडनी रॅकेटबाबत मोठा खुलासा समोर आला. हा युवक का स्वत:ची किडनी विकायला तयार झाला हे त्याने समोर आणले. त्याची कहाणी अनेकांना भावूक करत आहे.
आर्थिक तंगी, फी भरायला पैसे नाहीत
हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या आयुषने पोलीस चौकशीत सांगितले की, मागील २ महिन्यापासून फी न भरल्याने मी तणावात होतो. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती बिकट झाली. जमीन गहाण ठेवूनही कर्ज मिळत नव्हते. त्यात एका अज्ञात व्यक्तीने मला किडनी विकायला तयार केले. त्याने ६ लाख रूपये देऊ असा शब्दही दिला. आधी रक्कम द्या मग ऑपरेशन करू असं आमच्यात ठरले. सर्जरीनंतर माझ्या खात्यात फक्त साडे तीन लाख आले. बाकी पैसे दिले नाहीत असं आयुषने सांगितले.
कुटुंबावर पडलेल्या आर्थिक बोझा कमी व्हावा आणि माझं शिक्षण पुढेही सुरू राहू शकेल यासाठी मी ही जोखीम उचलली. परंतु माझ्या या निर्णयाने कुटुंबाला धक्का बसला. सध्या अवयव दाता आयुष आणि त्याची किडनी दिलेल्या पारुल यांना पुढील उपचारांसाठी लखनौला पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत. मुझफ्फरनगरच्या पारूलला २९ मार्चला आहूजा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर किडनी प्रत्यार्पण करण्यात आले. ऑपरेशननंतर प्रकृती बिघडल्यानंतर तिला आणि आयुषला ३० मार्च रोजी रात्री लखनौच्या मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Web Summary : Facing financial hardship, a youth sold his kidney for education but received less money than promised after the operation. He only received Rs. 3.5 lakhs instead of Rs. 6 lakhs. Both donor and recipient are now hospitalized for further treatment.
Web Summary : आर्थिक तंगी से जूझ रहे एक युवक ने शिक्षा के लिए अपनी किडनी बेच दी, लेकिन सर्जरी के बाद उसे वादे से कम पैसे मिले। उसे 6 लाख की जगह केवल 3.5 लाख रुपये मिले। दाता और प्राप्तकर्ता दोनों अस्पताल में भर्ती हैं।