पत्नी अन् सासूच्या छळाला कंटाळून युवकानं उचललं टोकाचं पाऊल; मोबाईल व्हिडिओतून रहस्य उलगडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 11:03 IST2025-12-01T11:02:48+5:302025-12-01T11:03:57+5:30
गेल्या काही महिन्यापासून युवक मानसिक तणावात होता. तो स्वत:ला खूप एकटे समजत होता. ज्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असा आरोप

पत्नी अन् सासूच्या छळाला कंटाळून युवकानं उचललं टोकाचं पाऊल; मोबाईल व्हिडिओतून रहस्य उलगडणार?
इंदूर - मध्य प्रदेशच्या इंदूर येथे रविवारी सासू आणि पत्नीच्या त्रासाला कंटाळून युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या युवकाच्या फोनमधून काही व्हिडिओ आणि चॅटही सापडले आहे. ज्यातून कौटुंबिक तणाव आणि मानसिक छळाला त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आले.
माहितीनुसार, दिवाळीत युवकाची पत्नी दोघांमधील वादानंतर माहेरी निघून गेली होती. ज्यानंतर काही काळ तणाव सुरू होता. तो सातत्याने पत्नीला घरी परत आणण्यासाठी प्रयत्न करत होता परंतु पत्नी त्याच्यासोबत येण्यास तयार नव्हती. पत्नी आणि सासू यांनी युवकाचा मानसिक छळ केला. त्यातून तो तणावात होता. यामुळे मुलाने स्वत:चा जीव दिला असा आरोप मृत युवकाच्या कुटुंबाने केला आहे.
गेल्या काही महिन्यापासून युवक मानसिक तणावात होता. तो स्वत:ला खूप एकटे समजत होता. ज्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. युवकाच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे. यातील दोषींना कठोर शिक्षा मिळायला हवी अशी मागणी मृत युवकाच्या भावाने केली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून गुन्हा नोंदवला आहे. त्याशिवाय युवकाच्या मोबाईल डेटा, चॅटिंग, व्हिडिओची तांत्रिक पडताळणी सुरू आहे.
या युवकाने विष पिऊन स्वत:चे जीवन संपवले आहे. मृतकाच्या कुटुंबाने त्याच्या पत्नी आणि सासूवर युवकाचा छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. हा तपास पूर्ण झाल्यानंतर यातील दोषींवर योग्य ती कारवाई करू असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.