विकृतीचा कळस! 90 वर्षीय आजीवर घरात घुसून सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 13:10 IST2020-11-03T13:09:09+5:302020-11-03T13:10:07+5:30

Crime News : वृद्ध महिलेच्या घरामध्ये घुसून दोघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

90 year old elderly woman gang raped in tripura | विकृतीचा कळस! 90 वर्षीय आजीवर घरात घुसून सामूहिक बलात्कार

विकृतीचा कळस! 90 वर्षीय आजीवर घरात घुसून सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली - देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना  घडली आहे. 90 वर्षीय आजीवर घरात घुसून सामूहिक बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. वृद्ध महिलेच्या घरामध्ये घुसून दोघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर रोजी त्रिपुरा जिल्ह्यातील कंचनपूरमधील बरहलदी गावात ही घटना घडली.  त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. बलात्काराच्या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक भानुपद चक्रवर्ती यांनी दिली आहे. अधिकाऱ्याने एक आरोपी महिलेला आजी म्हणायचा. महिला घरात एकटी राहत होती. घटनेच्या रात्री आरोपी आणि दुसरा व्यक्ती घरात घुसले आणि वृद्ध महिलेसोबत बलात्कार केल्याची माहिती दिली आहे.

बलात्कारानंतर दोन्ही आरोपी फरार

कुटुंबीयांना या भयंकर घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी 5 दिवसांनंतर पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पीडित वृद्ध महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहितीी पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

हाथरस पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलांनी केला 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

हाथरस पुन्हा एकदा हादरले आहे. काही दिवसांपूर्वी अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली होती. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. , हाथरसमध्ये अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे वय 9 आणि 12 वर्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक हाथरस पोलीस ठाण्यात बलात्काराच्या घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली.

Web Title: 90 year old elderly woman gang raped in tripura