शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

अ‍ॅट्रॉसिटीची धमकी देऊन उकळली ८.४० लाखांची खंडणी, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 19:46 IST

शाहूपुरी पोलिसांची कारवाई 

ठळक मुद्देनिंबाळकर यांची सामाजिक पत धोक्यात आणण्याची भीती घालून त्यांच्याकडून साठे याने एकूण ८ लाख ४० हजार रोख स्वरुपात घेतले.

सातारा : अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ८ लाख ४० हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी चंद्रकांत दादासो साठे ऊर्फ बाळू साठे (वय ३५, रा. शाहू बोर्डिंगजवळ, व्यंकटपुरा पेठ, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकरराव गुलाबराव निंबाळकर (वय ५२, रा. गडकर आळी शाहुपूरी, सातारा) हे २०१५ पासून कोटेश्वर मंदिरात भजनासाठी जातात.

तेथे बाळू साठे हा ढोलकी वाजविण्यास यायचा. त्यामुळे त्यांच्याशी शंकरराव निंबाळकर यांची ओळख झाली. २०१८ मध्ये साठे याने  निंबाळकर यांना भाजी विक्रीच्या व्यवसायासाठी तीन लाख मागितले. मात्र, निंबाळकर यांनी पैसे देण्यास नकार दिला. परंतु साठे याने पैसे दिले नाहीत तर तुमच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. खोटा गुन्हा नोंद होण्याच्या भीतीपोटी निंबाळकर यांनी बाळू साठेला रोख स्वरूपात तीन लाख रुपये दिले. त्यानंतरही साठे याने वेळोवेळी निंबाळकर यांना अ‍ॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कोल्हापूर येथील करवीर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, तो माघारी घ्यायचा आहे, अशी खोटी माहिती देऊन निंबाळकर यांच्याकडे त्याने पैशाची मागणीही केली. निंबाळकर यांची सामाजिक पत धोक्यात आणण्याची भीती घालून त्यांच्याकडून साठे याने एकूण ८ लाख ४० हजार रोख स्वरुपात घेतले.

दरम्यान, शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी  पुन्हा निंबाळकर यांना बाळू साठे याने दोन लाखांची मागणी केली.  या प्रकाराला कंटाळून अखेर निंबाळकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी बाळू साठेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली  हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, मोहन पवार, पंकज मोहिते, सुनिल मोहरे यांनी संशयित आरोपी बाळू साठे याला अटक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे तपास करत आहेत.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

 

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

 

Sushant Singh Rajput Case : शोविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत NCBची कोठडी

टॅग्स :ExtortionखंडणीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस