8 vehicles collided on Yamuna Expressway, dens fog killed 3 people | यमुना एक्स्प्रेस वेवर दाट धुके; 8 गाड्या एकमेकांवर आदळून अपघात, 3 ठार

यमुना एक्स्प्रेस वेवर दाट धुके; 8 गाड्या एकमेकांवर आदळून अपघात, 3 ठार

नोएडा : यमुना एक्स्प्रेस वे हा हिवाळ्यामध्ये अपघाताचा सापळाच बनत चालला आहे. दाट धुक्यामुळे आज एकमेकांवर 8 गाड्या आदळून झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


सोमवारी सकाळी थंडीमुळे दाट धुके पसरले होते. सव्वा सात वाजण्याच्या सुमारास एकमेकांवर 8 गाड्या आदळल्या. 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे एसपी विनीत जयस्वाल यांनी सांगितले. अपघातातील जखमींना एसएन मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले आहे. उपचारावेळी गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हाथरसचे डीएम आणि एसपी घटनास्थळी दाखल झाले. एकूण तीन जणांचा या अपघातात मृत्यू झाला.अपघातानंतर रस्त्यावर किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. आजुबाजुचे आणि इतर वाहनांमधील लोक मदतीसाठी धावले. जखमींना अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढून पोलिसांना कळविण्यात आले. यानंतर पोलिसांनी जखमींना आग्र्याच्या एसएन मेडिकल कॉलेजमध्ये हलविले. 
अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजुला केल्यानंतर यमुना एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. 

Web Title: 8 vehicles collided on Yamuna Expressway, dens fog killed 3 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.