शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
2
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
3
धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
4
Saudi vs USA: सौदी अरबने अमेरिकेला दिला ५० वर्षांतील सर्वात मोठा धक्का, प्रकरण काय?
5
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
6
स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी
7
भारत-पाकिस्तान क्रिकेट रद्द करा! उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र
8
सेहवागनं लायकी काढली! पण शाकिबनं स्फोटक खेळी करताच रूबाब दाखवला, म्हणाला...
9
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम! सुपर-८ मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर
10
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
11
"त्यानं भारताविरूद्ध जे केलं ते...", नसीम शाहच्या समर्थनार्थ पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात!
12
'इंडस्ट्रीत एखाद्याच्या मागून....'; सिद्धार्थने सांगितली कलाविश्वातील खटकणारी गोष्ट
13
Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?
14
भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर
15
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
16
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
17
पदवीधरमधील विजय अपप्रचाराचे बारा वाजवेल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
18
भाजीपाल्याचा दुष्काळ: फरसबी, वाटाण्यासह दोडका १६० रुपये किलो, गवार, शेवग्यानेही ओलांडली शंभरी
19
'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला
20
'घरातील काम ही फक्त महिलांची जबाबदारी का?' लोकप्रिय अभिनेत्री सान्या मल्होत्राचा सवाल

माणुसकीला काळीमा! 15 वर्षीय मुलीवर सलग 5 महिने तब्बल 17 जणांनी केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 12:49 PM

Crime News : पीडित मुलीवर गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि तस्करी केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर सलग 5 महिने तब्बल 17 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीवर गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि तस्करी केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकच्या चिक्कमंगळुरूमध्ये ही घटना घडली असून आरोपींमध्ये मुलीच्या मावशीचाही समावेश आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षांच्या मुलीवर सलग पाच महिने 17 जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. यामध्ये मुलीची मावशी मुख्य आरोपी आहे. सर्वप्रथम जिल्हा बालकल्याण समिती सभापतींनी 30 जानेवारीला पोलीस ठाण्यात 17 जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दगड फोडणाऱ्या युनिटमध्ये काम करत असताना गिरीश नावाच्या एका बसचालकासोबत ओळख झाली.

गिरीशने मुलीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर गिरीशने तिचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. अभीने पीडितेचे फोटो, व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल केलं. नंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पीडित मुलगी आईचा मृत्यू झाल्यानंतर मावशीसोबत राहत होती. आरोपींची ओळख पटली असून यामध्ये अभी, गिरीश, विकास, मनीकांता, संपथ, अश्वतगौडा, राजेश, अमित, संतोष, निरंजन, नारायण गौडा, अभी गौडा, योगेश, मुलीची मावशी आणि काहींचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! महिलेने छेडछाडीला विरोध केला म्हणून "त्याने" चिमुकलीला शेकोटीत फेकलं अन्... 

मुझफ्फरपूरमध्ये महिलेने छेड काढणाऱ्याला विरोध केल्यानंतर तिच्या तीन वर्षांच्या मुलीला शेकोटीत फेकल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने तातडीने मुलीला शेकोटीतून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत चिमुकली आगीत होरपळली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मुझफ्फरपूरमधील बोचहा गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आगीत होरपळलेल्या चिमुकलीला लगेचच उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

विकृतीचा कळस! रुग्णालयाच्या ICU मध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, घटनेने खळबळ

घराबाहेर पेटवलेल्या शेकोटीच्या बाजूला महिला बसली होती. एकटीला पाहून गावातील तरूण त्या ठिकाणी आला आणि शेक घेण्याच्या बहाण्याने शेकोटीजवळ बसला. थोड्या वेळाने त्याने महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. महिलेने या छेडछाडीला विरोध केला. त्यावेळी रागाच्या भरात आरोपीने महिलेच्या कुशीत असलेल्या तिच्या तीन महिन्यांच्या मुलीला हिसकावलं आणि शेकोटीत फेकलं. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. महिलेने आपल्या चिमुलीला शेकोटीतून बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत ती होरपळली होती. महिलेने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकRapeबलात्कारPoliceपोलिस